सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांची बेदम धुलाई करुन 250 पार मजल मारली आहे. हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात आरसीबीसमोर 256 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. हैदराबादची अशाप्रकारे 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही नववी वेळ ठरली. तसेच हैदराबादने या डावात 16 षटकार लगावले. हैदराबादला या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यात 5 फलंदाजांनी योगदान दिलं. मात्र तिघांनी प्रमुख भूमिका बजावली. हैदराबादसाठी कोणत्या फलंदाजाने किती धावा केल्या? हे सविस्तर जाणून घेऊयात.
हैदराबादची बॅटिंगहैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड याने दोघांनी 24 बॉलमध्ये 45 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. त्यांनतर हेड 26 रन्स करुन आऊट झाला. अभिषेक आणि इशानने दुसऱ्या विकेटसाठी 26 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 22 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 फोरसह 56 रन्स करुन माघारी परतला.
इशान-क्लासेनचा तडाखाइशान किशन आणि हेनरिक क्लासेन या सलामी जोडीने हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी फक्त 48 बॉलमध्ये 113 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर क्लासेन आऊट झाला. क्लासेनने 24 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 फोरसह 51 रन्स केल्या. तर हैदराबादने इशान किशन याच्या रुपात चौथी आणि अखेरची विकेट गमावली. इशानने हैदराबादसाठी सर्वाधिक धावा केल्या. इशानने 46 चेंडूत 3 सिक्स आणि 8 चौकारांसह 79 धावांचं योगदान दिलं. तर नितीश कुमार रेड्डी याने 3 षटकार आणि 1 चौकारसह 12 चेंडूत नाबाद 29 धावा केल्या.
आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाईआरसीबीसाठी एकूण 6 गोलंदाजांनी बॉलिंग केली. हैदराबादच्या फलंदाजांनी आरसीबीच्या प्रत्येक बॉलर विरुद्ध किमान 12 च्या इकॉनमी रेटने धावा केल्या. आरसीबीसाठी रसीख सलाम डार याने 2 विकेट्स मिळवल्या. तर सुयश शर्मा आणि कृणाल पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
आरसीबी ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. मात्र आरसीबीला प्लेऑफच्या हिशोबाने टॉप 2 मध्ये कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हैदराबाद विरुद्ध 166 धावा कराव्या लागणार आहेत. तर हैदराबादला टॉप 2 मध्ये पोहचायचं असेल तर आरसीबीला 165 रन्सपर्यंत रोखावं लागणार आहे.
लाईव्ह स्कोअरकार्ड
हैदराबादमधील आकडेवारी काय सांगते?राजीव गांधी स्टेडियममध्ये आयपीएल 2026 स्पर्धेतील आयोजित करण्यात आलेला हा सातवा सामना आहे. याआधी या मैदानात झालेल्या 6 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला आहे. तर चेजिंग करणाऱ्या संघाने 2 वेळा विजय मिळवला आहे. अशात आता हैदराबाद जिंकणार आरसीबी मैदान मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.