LSG vs PBKS Live Streaming : पंजाबला शेवटची संधी, लखनौ गेम ओव्हर करणार?
Tv9 Marathi May 23, 2026 03:45 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 68 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. लखनौ आणि पंजाब दोन्ही संघांचा हा 19 व्या मोसमाच्या साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना असणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याच्याकडे लखनौच्या नेतृत्वाची धुरा आहे. लखनौचं या हंगामातून पॅकअप झालंय. त्यामुळे लखनौसाठी हा सामना फक्त औपचारिकता आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र पंजाबसाठी प्लेऑफच्या हिशोबाने करो या मरो असा सामना आहे. त्यामुळे पंजाबचा चांगलाच कस लागणार आहे. या निमित्ताने सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना शनिवारी 23 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना एकाना स्टेडियम, लखनौमध्ये होणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहायला मिळेल?

लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

लखनौ पंजाबचा हिशोब करणार?

लखनौ आणि पंजाब दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 19 एप्रिलला आमनेसामने आले होते. पंजाबने त्या सामन्यात लखनौवर 54 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता स्पर्धेतून बाहेर झालेली लखनौ आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करण्यासह पंजाबचा गेम ओव्हर करुन पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाबने 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेतील पहिल्या 7 पैकी 6 सामन्यांत विजय मिळवला होता. त्यामुळे पंजाब प्लेऑफची प्रबळ दावेदार समजली जात होती. मात्र त्यानंतर पंजाबने सलग 6 सामने गमावले. त्यामुळे आता पंजाबसाठी प्लेऑफच्या हिशोबाने लखनौ विरुद्धचा सामना हा करो या मरो असा आहे. पंजाबने हा सामना जिंकला तर त्यांचे एकूण 15 गुण होतील. त्यानंतर मुंबईने राजस्थानला पराभूत केल्यास पंजाबचा आशा कायम राहतील. त्यामुळे या सामन्याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.