आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 67 व्या सामन्याचा निकाल समोर आला आहे. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी 22 मे रोजी आपल्या घरच्या मदैानात राजीव गांधी स्टेडियममध्ये गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. हैदराबादने बंगळुरुसमोर 256 रन्सचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मात्र बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 200 रन्सपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने यासह 55 धावांनी विजय मिळवला. हैदराबाद अशाप्रकारे आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. हैदराबादचा हा नववा विजय ठरला. तर आरसीबीला साखळी फेरीचा शेवट विजयाने करण्यात अपयश आलं. आरसीबीला हा सामना जिंकून 10 व्या विजयाची नोंद करण्याची संधी होती. मात्र आरसीबीची ही संधी हुकली.
हैदराबादकडून आरसीबीचा हिशोबहैदराबादला प्लेऑफच्या हिशोबाने टॉप 2 मध्ये राहण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज होती. मात्र हैदराबाद तसं करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे हैदराबाद सामन्यादरम्यानच टॉप 2 मध्ये आपल्या मोहिमेचा शेवट करण्यात अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं. मात्र हैदराबादने सामना जिंकला आणि आरसीबी विरूद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड केली. दोन्ही संघ 19 व्या मोसमात याआधी 28 मार्च रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा आरसीबीने हैदराबादवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता.
सामन्यात काय झालं?हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. हैदराबादसाठी इशान किशन याने सर्वाधिक 79 धावा केल्या. ओपनर अभिषेक शर्मा याने 56 रन्स जोडल्या. तर हेन्रिक क्लासेन याने 51 धावा केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. आरसीबीसाठी रसीख समान डार याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.
स्कोअरकार्ड
आरसीबीची बॅटिंगआरसीबीसाठी एकूण 6 फलंदाजांनी बॅटिंग केली. आरसीबीसाठी कॅप्टन रजत पाटीदार याने सर्वाधिक 56 धावा केल्या. ओपनर वेंकटेश अय्यर याने 44 धावांचं योगदान दिलं. देवदत्त पडीक्कल याने 21 रन्स केल्या. विराट कोहली याला 15 धावाच करता आल्या. तर कृणाल पंड्या आणि टीम डेव्हिड हे दोघे नाबाद परतले. कृणालने 41 आणि टीमने 15 धावांचं योगदान दिलं. हैदराबादसाठी एशान मलिंगा याने 2 विकेट्स घेतल्या. तर साकीब हुसैन आणि ट्रॅव्हीस हेड या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.