RCB VS SRH IPL 2026 : आयपीएल 2026 च्या (IPL 2026) 67 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा 55 धावांनी दणदणीत पराभव केलाय. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 255 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बंगळूर 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 200 धावांपर्यंतच पोहोचू शकले. मात्र पराभव होऊनही, आरसीबीने (RCB) आपले अव्वल-2 स्थान कायम राखले. अव्वल-2 मध्ये राहण्यासाठी संघाला 166 धावांची गरज होती. किंबहुना, विजयी हैदराबादला गुणतालिकेतील स्थानाच्या बाबतीत नुकसान सोसावे लागले. दरम्यान, हा आरसीबी आणि हैदराबाद या दोघांसाठी सुद्धा शेवटचा लीग स्टेज सामना होता. असे असताना हा सामना आता एका वेगळ्या कारणासाठी सध्या सर्वाधिक चर्चेत आला आहे. तो म्हणजे आरसीबी वि. हैदराबाद सामन्यात विराट (Virat Kohli) आणि हेडमध्ये (Travis Head) भर मैदानात रंगलेला वाद. (Travis Head and Virat Kohli)
Travis Head vs Virat Kohli : भर मैदानात हायव्होल्टेज ड्रामा, हॅन्डशेक करणंही टाळलं
सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील राजीव गांधी स्टेडियमवर झालेला हा सामना विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड यांच्या दोघांमधील वादामुळे सध्या अधिक चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी भर मैदानात झालेल्या हायव्होल्टेजड्रामा हा केवळ सामन्यापुरताच मर्यादित राहिला नाही तर सामना संपल्यावर सुद्धा बघायला मिळालं. सामना संपल्यानंतर या दोन स्टार क्रिकेटर्सनी एकमेकांकडे नजर न मिळवता हॅन्डशेक करणंही टाळल्याचे दिसून आलं.
View this post on Instagram
Travis Head Virat Kohli : ट्रॅव्हिस हेड आणि विराट कोहलीमध्ये नेमकं काय झालं?
SRH विरुद्ध RCB सामन्यानंतरचा एक क्षण साध्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रॅव्हिस हेड विराट कोहलीकडे हस्तांदोलनासाठी हात पुढे करताना दिसला, पण हा संवाद अपेक्षेप्रमाणे झाला नाही. चाहत्यांनी लगेचच ऑनलाइन या क्षणावर चर्चा सुरू केली, काहींनी याला एक विचित्र गैरसमज म्हटले, तर काहींना वाटले की सामन्यानंतरच्या व्यस्त वातावरणात विराट कोहलीच्या कदाचित त्या हावभावाकडे लक्ष गेले नसेल. सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये असंख्य प्रतिक्रिया, मीम्स आणि चर्चा निर्माण झाल्या आहेत. विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड दोघेही मैदानावरच्या त्यांच्या तीव्र स्पर्धात्मक वृत्तीसाठी ओळखले जातात, ज्यामुळे SRH आणि RCB यांच्यातील उच्च-दबावाच्या आयपीएल सामन्यानंतर हा व्हायरल क्षण अधिकच चर्चेचा विषय बनला. हा व्हिडिओ आता विविध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, ज्यात चाहते या संवादाचे बारकाईने विश्लेषण करत आहेत आणि त्या काही सेकंदात नेमके काय घडले यावर वेगवेगळी मते मांडत आहेत.