पेट्रोल डिझेल सीएनजी दरवाढ देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांदा दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल लिटरमागे 90 पैशांनी महाग होऊन 108.49 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल (Diesel Price) लिटरमागे 94 पैशांनी महाग होऊन 95.02 रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर चार रुपयांपेक्षा जास्त महागले आहे. यासोबत सीएनजीच्या दरातही (CNG Rate) वाढ होण्याची संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलपाठोपाठ सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात एका रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजीचा प्रतिकिलो दर 81.09 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दिल्लीनंतर मुंबईतही सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Fuel Price)
यापूर्वी गेल्या आठवड्यात 15 मे आणि 19 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्यांदा ही वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण युद्धाचा उल्लेख करत, लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा काटकसरीनं वापर करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लगेच इंधन दरवाढीचे सत्र सुरु झाले आहे.
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात तिसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
मुंबई पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 108.45
डिझेल-95.02
Parbhani Petrol and Diesel rates
पेट्रोल – 110.45 पैसे
डिझेल- 97.02
कोल्हापूर पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 109.30
डिझेल- 95.89
भंडारा पेट्रोल आणि डिझेलचे दर
109.60 (पेट्रोल नवा दर)
96.18 (डिझेल नवा दर)
सोलापूर पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 109.14
डिझेल- 95.74
अमरावती पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 109.15
डिझेल- 95.68
वाशिम पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 109.79
डिझेल- 96.39
नाशिक पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 109.71
डिझेल- 96.26
नागपूर पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 108.97
डिझेल- 95.58
रत्नागिरी पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल – 110.44
डिझेल – 97.01
Ahilyanagar Petrol and Diesel rates
पेट्रोल – 108.87
डिझेल – 95.47
पुणे पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल – 108.76
डिझेल – 94.40
अकोला पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल – 109.05
डिझेल – 95.63
बीड पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल – 110.38
डिझेल – 96.92
छत्रपती पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल – 110.44
डिझेल – 97.10
गोवा पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 102.13
डिझेल- 93.91
रायगड पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 109.72
डिझेल- 96.25
चंद्रपूर पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 109.06
डिझेल- 95.68
धुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर
पेट्रोल- 108.95
डिझेल- 95.58
आणखी वाचा
Petrol Diesel Price Hike: महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, आता किती दर वाढले?
आणखी वाचा