मिडल ईस्टमधील तणाव अन् जागतिक बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक; चांदीचेही दर घसरले, जाणून घ्या आजचे ताजे दर
जयदीप मेढे May 23, 2026 02:13 PM

Gold-Silver Price Today May 23 : मिडल ईस्टमधील तणाव आणि जागतिक बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर २३ मे रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या (Gold-Silver Price Today) किमतींना अखेर ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये एकीकडे महागाई वाढत असतानाच आज (शनिवारी, ता २३) सकाळी सोन्याच्या दरात घट (Gold-Silver Price Today) झाली. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५९,६३० रुपयांवर आला आहे. तर मुंबईमध्ये हाच दर १,५९,४८० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला.(Gold-Silver Price Today)

याआधी दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेचे सोने ६०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,६४,९०० रुपयांवर आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट गोल्ड सुमारे ४,५२२.३२ डॉलर प्रति औंस या स्तरावर व्यवहार करत आहे.(Gold-Silver Price Today)

Gold-Silver Price Today May 23 : सोन्याच्या दरांवर परिणाम का?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण चर्चेकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून, मिडल ईस्टमधील तणाव, होर्मुझ सामुद्रधुनीची परिस्थिती आणि जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींमधील अस्थिरता याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे. त्याचबरोबर भारतीय रुपयातील चढ-उतारामुळेही सोन्याच्या किंमती प्रभावित होत आहेत.

Gold-Silver Price Today May 23 :तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर

दिल्ली
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,२४० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,६३० रुपये

मुंबई
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,१९० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,४८० रुपये

अहमदाबाद
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,२४० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,५३० रुपये

चेन्नई
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४७,७९० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,६१,२३० रुपये

कोलकाता
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,१९० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,४८० रुपये

हैदराबाद
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,१९० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,४८० रुपये

जयपूर
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,२४० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,६३० रुपये

भोपाळ
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,२४० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,५३० रुपये

लखनऊ
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,२४० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,६३० रुपये

चंदीगड
२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,४६,२४० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) - १,५९,६३० रुपये

Gold-Silver Price Today May 23 : चांदीच्या दरातही घसरण

सोन्यासोबतच चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. २३ मे रोजी सकाळी चांदीचा दर प्रति किलो २,८४,९०० रुपयांवर आला. याआधी यावर्षी जानेवारी महिन्यात चांदीने प्रति किलो ४ लाख रुपयांचा टप्पाही ओलांडला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हर सध्या सुमारे ७५.८७ डॉलर प्रति औंस या स्तरावर व्यवहार करत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.