Aishwarya Rai in Cannes: कान्समध्ये ऐश्वर्या रायला केलं इग्नोर? व्हायरल पोस्टमुळे नव्या वादाला सुरुवात
Saam TV May 23, 2026 06:45 PM

Aishwarya Rai in Cannes: विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही गेल्या अनेक वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हल मधील सर्वात चर्चित भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक रेड कार्पेट लूकची जगभरात चर्चा होते. यंदाही अभिनेत्रीने आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, तिच्या या उपस्थितीदरम्यान सोशल मीडियावर एक वेगळाच वाद रंगताना दिसत आहे.

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायने ‘इलेक्ट्रिक ब्लू’ रंगाचा आकर्षक मरमेड गाउन परिधान केला होता. या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय मोहक आणि एलिगंट दिसत होती. रेड कार्पेटवर तिने आत्मविश्वासात विविध पोझ दिल्या. इतकेच नव्हे तर तिने उपस्थित फोटोग्राफर्सनां फ्लाइंग किस देत चाहत्यांची मने जिंकली. तिचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rukmini Vasanth Video: प्रसिद्ध अभिनेत्रीचा बिकिनीतील 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल; व्हिडिओचं सत्य आलं समोर

ऐश्वर्याच्या या लूकचे चाहते भरभरून कौतुक करत असतानाच ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. त्या पोस्टमध्ये दावा करण्यात आला की, कान्समध्ये ऐश्वर्या रायकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले. पोस्टमध्ये लिहिले होते, “ऐश्वर्या रायचे फोटो कोणीच का काढत नाहीये? (मी तिच्या चाहत्यांसारखा मूर्ख नाही. मी फक्त त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देत आहे.”) असे उपरोधिक प्रकारे म्हटले आहे.

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; डिमेन्शिया आजाराशी झुंज ठरली अपयशी, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

ही पोस्ट व्हायरल होताच अभिनेत्रीचे चाहते संतप्त झाले. अनेकांनी त्या पोस्टला उत्तर देत ऐश्वर्याच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने लिहिले, “कॅमेऱ्यांचे फ्लॅशच बघा ना! ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष करणे शक्यच नाही.” असे म्हणत तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या फ्लॅशचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “ऐश्वर्या जिथे जाते तिथे सगळ्यांचे लक्ष तिच्याकडेच असते. अशा पोस्ट्स फक्त निगेटिव्ह पीआरसाठी केल्या जात आहेत.”

दरम्यान, ऐश्वर्या रायचा कान्समधील लूक मात्र पुन्हा एकदा फॅशनप्रेमी आणि चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या स्टाईल, आत्मविश्वास आणि ग्लॅमरने यंदाही रेड कार्पेटवर वेगळी छाप सोडली आहे. यावेळी तिच्यासोबत तिची लेक अराध्याचे देखील विशेष कौतुक होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.