अनुपम खेर यांचा मोठा खुलासा, थेट म्हणाले मला याची प्रचंड भीती..
Tv9 Marathi May 23, 2026 06:45 PM

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. त्यांनी तब्बल 500 चित्रपटात काम केले. नुकताच अनुपम खेर यांनी News18 India ला एका मुलाखत दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, माझी स्पर्धा माझ्या वयाच्या अभिनेत्यांसोबतच नाहीये. माझी स्पर्धा कार्तिक आर्यन याच्यासारख्या अभिनेत्यांसोबत आहे. या मुलाखतीत अनुपम खेर यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले. मुलाखतीत बोलताना अनुपम खेर यांनी म्हटले की, मला माझ्या वयातील कलाकारांची अजिबातच भीती वाटत नाही, पण मला नव्या कलाकरांची खूप जास्त भीती वाटते. माझी स्पर्धा माझ्या वयातील लोकांसोबत नाहीच. माझी स्पर्धा कार्तिक आर्यन याच्यासारख्या नव्या कलाकारांसोबत आहे. नव्या कलाकारांमध्ये एक ऊर्जा आणि मोठी भूक असते. त्यामुळेच ते खूप जास्त चांगले काम करतात आणि मेहतन करण्याकरिता प्रेरणा देतात.

मी ज्यावेळी कार्तिक आर्यन याच्यासारख्या कलाकारांकडे बघतो, त्यावेळी मला कळते की, मला अजून बरेच काही करण्याचे शिल्लक आहे. मला त्यांच्यासारख्या कलाकारांकडून ऊर्जा मिळते. जर तुम्ही शिकणे बंद केले तर तुम्ही संपणार. आज चित्रपट खूप जास्त बदलत आहे. तरूण कलाकार खूप जास्त मेहतन घेत आहेत. अनुपम खेर यांनी म्हटले की, थिएटर ही एक खूप मोठी शाळा आहे.

चित्रपटात काम करण्यास सुरूवात केल्यानंतरही मी कधीच थिएटर करणे सोडले नाही. यादरम्यान ते त्यांच्या शाळेतील किस्से सांगताना देखील दिसले. शाळेमध्ये एक नाटक करत असताना आपल्यासोबत काय घडले आणि आपण किती चुका त्यावेळी केल्या. हेच नाही तर मुख्याध्यापकांनी नाटकातून काढून टाकण्याचीही धमकी अनुपम खेर यांना दिली होती.

अनुपम खेर हे बॉलिवूडमधील असे एक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत सतत काम केले. कायमच धमाकेदार अभिनय करताना ते दिसतात. मोठा जिद्दीने त्यांचे अभिनेता बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईत येऊन त्यांना सुरूवातीच्या काळात अत्यंत मोठा संघर्ष करावा लागला. त्यांनी त्यांच्या जिद्दीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.