ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
युवराज जाधव May 23, 2026 09:13 PM

1. महागाईचा भडका कायम, 15 मे पासून पेट्रोल-डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, मुंबईत पेट्रोल 108.45 रुपयांवर तर डिझेलचा दर 95.02 रुपये लीटरवर पोहोचला https://tinyurl.com/4j9p67pt  सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना वेळेत डिझेल उपलब्ध करुन देण्याचे आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इंधन टंचाईवरील उपाययोजनांची माहिती https://tinyurl.com/d7mjsta8 

 

2. महायुतीत विधानपरिषदेसाठी 17 पैकी 1 जागेवरुन तिढा कायम; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदेंना भेटले, ठाण्याच्या जागेवर भाजपच्या संजय केळकर यांचा दावा, अद्याप तोडगा नाहीच https://tinyurl.com/4scbjhaw  भंडारा - गोंदिया विधानपरिषद जागेवरुन महायुतीत तिढा कायम; भाजपसह, राष्ट्रवादीनंही शड्डू ठोकला; या जागेवर काँग्रेसच जिंकणार, नाना पटोलेंचा दावा https://tinyurl.com/4deu46ue  शिवसेनेकडून राजन साळवी कोकण विधानपरिषदेच्या मैदानात उतरण्याची शक्यता, महायुतीत कोकणच्या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी https://tinyurl.com/43vkcvkf 

 

3. देशातील सर्वात मोठे तोफगोळे, 365 दिवस पुरतील इतकं उत्पादन, ड्रोन आणि मिसाईल्स, साईंच्या शिर्डीत भक्तीसोबत शक्तीचा नवा प्रकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती https://tinyurl.com/52cv8dzx 

 

4. पुणेच बनलंय NEET यूजी परीक्षा घोटाळ्याचं केंद्रबिंदू; आधी मांढरे, मग कुलकर्णी आणि आता मनीषा हवालदार सीबीआयच्या अटकेत, एनटीएच्या कारभारावरही संशयाची सुई https://tinyurl.com/bdzec29k 

 

5. कॉकरोच जनता पार्टीवर तिसरी मोठी कारवाई; एक्स, इन्स्टाग्रामनंतर आता वेबसाईटही बंद, अभिजीत दिपकेची माहिती https://tinyurl.com/ybxs34mp  सोशल मीडिया खाती बंद झाल्यानं आंदोलन करु नका, सरकार आपल्या चुकीची वाट पाहतेय, अभिजीत दिपकेचं समर्थकांना आवाहन https://tinyurl.com/yknp5sds 

 

6. उष्णतेची लाट कायम राहिली तर शाळा 15 जून नव्हे 26 जूनपासून सुरु होणार,शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे संकेत https://tinyurl.com/39mndrkp 

 

7. विश्वासूच निघाला चोर! आळंदीत माऊलींच्या दानपेटीतील रक्कम लंपास; संस्थान कमिटीच्या कारभारावरुन भाविकांचे सवाल https://tinyurl.com/4kcjdspx  सेवेकरी विशाल वारुळेचा आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, वारुळेच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली https://tinyurl.com/2aamc8ta 

 

8. पुढील 3 ते 4 दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी वातावरण अनुकूल, यंदा वेळेआधीच केरळात आगमन दाखल होणार, भारतीय हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/bdcam6y5 

 

9. चीनमध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोटात 90 जणांचा मृत्यू, स्फोटावेळी खाणीत 247 जण काम करत असल्याची माहिती, दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना https://tinyurl.com/y3k8cwpz 

 

10. आयपीएलच्या लीग स्टेजमधील फक्त 3 मॅच बाकी, आता मुंबई इंडियन्सवर ठरणार 4 संघांचं भवितव्य! आज लखनौ सुपर जायंटस आणि पंजाब किंग्ज आमने सामने https://tinyurl.com/y7kj538b 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

अहिल्यानगरच्या शेवगावमधील जायभाय कुटुंबातील 7 जणांना आंब्याचा रस खाल्ल्याने विषबाधा; आंबे पिकवण्यासाठी वापरलेल्या केमिकलमुळं विषबाधा झाल्याचा डॉक्टरांचा संशय https://tinyurl.com/3eanaavj 

 

भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा 40 ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात https://tinyurl.com/ypsmyftp 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.