ड्रॅगनच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार भारत,चीनच्या अंगणात तिन्ही बाजूंनी ब्रह्मोसचे वादळ, आणखी एक करार…
GH News May 23, 2026 10:11 PM

Brahmos Missile Deal: भारताचे सुपरसॉनिक मिसाईल ब्रह्मोस आता चीनसाठी डोकेदुखी ठरू शकणार आहे. Nikkei Asia च्या वृत्तानुसार फिलीपाईन्स आणि इंडोनेशिया यांच्या नंतर आता चीनचा शेजारील देश व्हिएतनामने देखील भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदीसाठी रस दाखवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-व्हिएतनाम डील आता सिग्नेचर स्टेजवर आहे. केवळ काही अंतिम गोष्टीवर चर्चा सुरु आहे. जर ही डील झाली तर याचा अर्थ चीनच्या दरवाज्यापर्यंत भारताचे हे घातक सुपरसॉनिक मिसाईलची आणखी एक तैनाती आहे.

व्हिएतनाम आणि चीनमध्ये वाद काय ?

व्हिएतनाम आणि चीनच्या दरम्यान साऊथ चायना सी संदर्भात अनेक वर्षांपासून वाद आहे. चीन सातत्याने या क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत आला आहे. तर व्हिएतनाम देखील या क्षेत्रावर आपला दावा करत असतो. अशात जर व्हिएतनामला ही खतरनाक ब्रह्मोस मिसाईल जर मिळाली तर ही केवळ शस्रास्र खरेदी ठरत नाही. त्याऐवजी हा चीनला थेट धोरणात्मक इशारा मानला जाणार आहे. यासाठी चीनच्या नाकासमोर ही डील होत आहे असे म्हटले जात आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा दोन्ही देशांदरम्यान ब्रह्मोस विक्रीवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

फिलीपाईन्स आणि इंडोनेशियाच्या नंतर आता व्हिएतनाम जवळ ब्रह्मोस असणार आहे. भारताने २०२२ मध्ये फिलीपाईन्स सोबत ३७५ मिलियन डॉलरची ब्रह्मोस डील केली होत. आणि २०२४ ला त्याची पहिली खेप पोहचली. यानंतर इंडोनेशियाने देखील मार्च मध्ये ब्रह्मोस खरेदीचा करार अंतिम केला. जर व्हिएतनामने देखील हे मिसाईल खरेदी केली तर ASEAN क्षेत्रात भारताची संरक्षण मजबूती आणखी वाढणार आहे.

ब्रह्मोस इतके धोकादायक का ?

ब्रह्मोस जगातील सर्वात वेगवान क्रुझ मिसाईन मानले जाते. याचा वेग २.५ ते २.८ मॅक आहे. म्हणजे ३,००० किमी प्रति तास वेगाने हे मिसाईल हल्ला करु शकते. याची खास बाब म्हणजे या मिसाईलला जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडी चारही प्लॅटफॉर्मवरुन डागता येते. ब्रह्मोस २००-३०० किलोचे वॉरहेड घेऊन जाऊ शकते. आणि २९० किमीपर्यंत हल्ला करु शकते. ऑपरेशन सिंदुर दरम्यान या मिसाईलने आपली ताकद दाखवली आहे. पाकिस्तानकडील एकही चीनी एअर डिफेन्स सिस्टीम ब्रह्मोसला रोखू शकले नाही.

भारतासाठी काय फायदा ?

व्हिएतनामचे चीनसोबत आर्थिक संबंध जरी असले तरी साऊथ चायना सी मध्ये बीजिंग सोबत आक्रमकतेमुळे चिंतीतही आहे. एक्सपर्टच्या मते अमेरिकेची इंडो-पॅसिफीक रणनीती संदर्भात व्हिएतनाम सारखे देश आता त्यांची सैन्य शक्ती स्वत: वाढवू इच्छीत आहेत. चीनच्या शेजारी आचा भारताची मिसाईल कुटनिती वेगाने पसरत आहे. जर ही डील अंतिम झाली तर भारताचे डिफेन्स एक्सपोर्ट प्रोफाईल आणि मजबूत होईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.