PBKS vs LSG: करो या मरोच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने, कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…
Tv9 Marathi May 23, 2026 10:45 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा या स्पर्धेतील 68वा सामना असून दोन्ही संघांचा लीग स्पर्धेतील शेवटचा सामना आहे. या स्पर्धेतून लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर पंजाब किंग्सला हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने जिंकणं भाग आहे. हा सामना पंजाब किंग्सने गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण पंजाब किंग्सने हा सामना जिंकला तर राजस्थान रॉयल्स आणि केकेआरच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल. दरम्यान, या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या बाजूने कौल लागला. नाणेफेकीच कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. दोन बदल केले आहेत. मार्को आणि वैशाक संघात आहेत. वातावरण खूप उत्साहवर्धक आहे, मी म्हणेन की हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही यापूर्वी कधीही अशा परिस्थितीत नव्हतो आणि मुले सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. गोलंदाजी असो वा फलंदाजी, ही खेळपट्टी क्रिकेटसाठी चांगली आहे. ही फलंदाजीसाठी उत्तम खेळपट्ट्यांपैकी एक आहे, त्यामुळे हा सामना जास्त धावांचा होऊ शकतो. दोन बदल केले आहेत. अर्जुन आणि अर्शिन कुलकर्णी संघात आहेत. हा हंगाम खूप खडतर होता, पण त्याचबरोबर संघ आणि वैयक्तिक पातळीवरही खूप काही शिकायला मिळालं. मला चाहत्यांची माफी मागावीशी वाटते, ते संपूर्ण उत्तर प्रदेशातून आले आहेत. आमच्यासाठी हा काळ खूप खडतर होता, पण आज आम्ही आमचे 100 टक्के देऊ.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, विजयकुमार विषक, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल.

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): जोश इंग्लिस, अर्शीन कुलकर्णी, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), अब्दुल समद, मुकुल चौधरी, अर्जुन तेंडुलकर, मोहम्मद शमी, प्रिन्स यादव, मोहसीन खान.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.