लहान मुलांच्या वाईट सवयी: नाक आणि तोंडात बोटे घालण्याची सवय कशी सोडवायची?
Marathi May 25, 2026 09:25 AM

लहान मुलांमध्ये सतत नाकात आणि तोंडात बोट घालण्याची सवय अतिशय सामान्य असली, तरी ती आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. दिवसभर वेगवेगळ्या वस्तूंना हात लावल्यामुळे मुलांच्या नखांमध्ये आणि बोटांवर असंख्य जंतू साचलेले असतात. जेव्हा मुलं हेच बोट नाका-तोंडात घालतात, तेव्हा ते जंतू थेट शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे पोट दुखणे, जंत होणे, सर्दी-खोकला होण्याचा धोका थेट पटीने वाढतो. त्यामुळे मुलांची ही सवय वेळेतच कशी सोडवावी, याविषयी तज्ज्ञांनी दिलेला सल्ला घेऊयात.

नक्कल करा

मुलांची नाकात बोट घालण्याची सवय दूर करण्यासाठी जेव्हा ते असं करतील तेव्हा त्यांची नक्कल करुन त्यांना दाखवा. जेव्हा त्यांना कळेल हे किती विचित्र दिसतेय तेव्हा ती सवय ते सोडतील.

हेही वाचा – Parenting Tips: प्रत्येक आईने मुलीला शिकवावी ‘ही’ एक सवय

रुमाल द्या

सर्दी होईल तेव्हा नाकात बोट घालण्याऐवजी रुमालाने ते पुसण्यास सांगा. यासाठी मुलांच्या खिशात रुमाल ठेवण्याची सवय लावा.

व्यस्त ठेवा

मुलं जेव्हा रिकामी असतात किंवा टीव्ही बघत असतात, तेव्हा नकळतपणे त्यांचा हात नाका-तोंडात जातो. अशा वेळी त्यांच्या हातात स्ट्रेस बॉल, क्ले, एखादं खेळणं द्या, जेणेकरून त्यांचे हात व्यस्त राहतील.

नखे नियमित कापा

नखांमध्ये घाण आणि जंतू साचल्यामुळे नाकात किंवा तोंडात खाज सुटू शकते. यासाठी मुलांची नखे नेहमी लहान आणि स्वच्छ ठेवा, जेणेकरून संसर्ग होणार नाही.

कौतुक करा

जेव्हा मूल बोट न घालता बऱ्याच वेळ शांत बसेल, तेव्हा त्याचे कौतुक करा. “आज माझ्या बाळाने तोंडात बोट नाही घातलं” असं म्हणून त्यांना एखादं छोटं चॉकलेट द्या. यामुळे त्यांना ही सवय सोडवण्याची प्रेरणा मिळेल.

हेही वाचा – बच्चेकंपनीची शाळेची तयारी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.