Petrol-Diesel Price Hike: सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना त्यात पुन्हा काहीशी भर घालणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ (Petrol And Diesel Prices Rise) झाली आहे. दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले असून मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये प्रति लीटर, तर डीझेल 2. 81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे. (Petrol And Diesel Prices Rise)
Petrol-Diesel Price Hike: दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ
सर्वात महत्वाची बाब म्हणजे, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरवाढ आहे. पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे ₹3 ने झाली. त्यानंतर 19 मे रोजी सुमारे 90 पैशांनी, पुन्हा 23 मे रोजी सुमारे 90 पैशांनी आणि आता, 25 मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. एकूणच, गेल्या 10 दिवसांत पेट्रोल प्रति लिटर ₹7.35 ने आणि डिझेल प्रति लिटर ₹7.53 ने महाग झाले आहे.
मुंबईत पेट्रोल 2.76 रूपये वाढले .. मुंबईत पेट्रो 111.21 रूपये प्रति लीटर तर डीझेल 2.81 रूपयांनी वाढून 97.83 रूपये प्रति लीटर एवढे झाले आहे.
नागपूर मध्ये पेट्रोल 2.72 पैशाने वाढले सध्या पेट्रोल 111.70 रुपये झाले
तर डिझेल 2.81 पैशानी वाढले डिझेल चे नवीन दर 98.76 रुपये झाले.
सोलापूर पेट्रोल/डिझेल दर
जुने -
पेट्रोल - 109.14
डिझेल - 95.74
आज -
पेट्रोल - 111.87
डिझेल - 98.55
पेट्रोल
काल - 109.36
आज - 111.77
डिझेल
काल - 96.08
आज - 98.46
109.60 (पेट्रोल जुना दर)
112.32 (पेट्रोल नवा दर)
96.18 (डिझेल जुना दर)
98.99 (डिझेल नवा दर)
बुलढाणा - पेट्रोल 112.49 ( आजचा ) / 2.72 वाढल
डिझेल - 99.16 ( आजचा ) / 2.81
लंडनमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 190 च्या वर गेले आहेत. युरोपियन युनियनमध्येही दर प्रति लिटर ₹179 च्या वर गेले आहेत. सध्या जगातील सर्वात महाग पेट्रोल हाँगकाँगमध्ये आहे, जिथे दर प्रति लिटर जवळपास 300 पर्यंत पोहोचले आहेत. नेदरलँड्समध्ये सध्या पेट्रोल 2.90 USD ला विकले जात आहे, जे भारतीय चलनात अंदाजे 245-₹255 प्रति लिटर इतके होते.