मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याकडून आमदार इंद्रीस नायकवाडींना राजीनामा देण्यास सूचना?
Marathi May 25, 2026 06:25 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा नेतृत्वाकडून आमदार इद्रिस नायकवडी यांना राजीनामा मागण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री यांचे ओएसडी यांनी इद्रीस नायकवडी यांची भेट घेऊन राजीनामा देण्याबाबत पक्षाकडून सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांना दिली.  मात्र, इद्रीस नायकवडी यांच्याकडून आपण राजीनामा देणार नसल्याची ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.  उद्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या आमदारांची (MLA) मुंबईत बैठक होत असून या बैठकीत राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अद्याप आपल्याला कुठल्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आला नसल्याचेही इद्रीस नायकवाडी यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले.

इद्रीस नायकवडी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार आहेत. दिवंगत नेते अजित पवार यांनी अल्पसंख्यांक चेहरा म्हणून इद्रीस नायकवाडी यांना विधानपरिषद आमदारकीची संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर आता पक्षातील नेतृत्वाकडून त्यांना राजीनामा मागितला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे स्वीय सहायक इद्रीस नायकवाडी यांना भेटल्याचे समजते. मात्र, ओएसडी हे मंत्रालयात, सातत्याने भेटत असतात. मात्र, मला पक्षाकडून कुठल्याही प्रकारचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली नसल्याचे इद्रीस नायकवाडी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची सूचना आपल्याला यापूर्वी कधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न नाही अशी ठाम भूमिका इद्रीय नायकवाडी यांनी घेतली आहे.

कोण आहेत इद्रीस नायकवडी?

अहो इद्रिस नायकवडी सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेचे माजी महापौर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. दिवंगत नेते अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यपाल नियुक्त कोट्यातून 15 ऑक्टोबर 2024 ला त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्यात आले होते. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांना संधी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नायकवाडी यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अल्पसंख्याक समाजात नायकवडी यांच योगदान आणि महत्व आहे. त्यामुळेच, त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली होती.

हेही वाचा

2029 च्या निवडणुकीत बारामतीतून कोण? युगेंद्र पवारांनी सांगतिली कार्यकर्त्यांची इच्छा; विलिनीकरणावरही परखड भाष्य

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.