मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) माडेल अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Pande) 'चांद मेरा दिल' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून ती सध्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये अनन्या पहिल्यांदा अभिनेता लक्ष्यसोबत स्क्रिन शेअर करताना दिसते. या चित्रपटाला क्रिटिक्सने चांगला रिव्ह्यू दिला असून बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला म्हणावा तसा प्रभाव दिसला नाही. मात्र, ओपनिंग विकेंडला सिनेमाने चांगली कामगिरी करत 10 कोटींचा आकडा पार केला आहे. सिनेमाच्या कमाईसोबतच अनन्याच्या कमाईचा विचार केला तर ती बॉलीवूडमधील मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्रीपैकी एक आहे. जनरेशन झेडची ती अशी स्टार आहे जिने कमी वयात विशाल साम्राज्य उभा केलंय. विशेष म्हणजे ती सिनेमासोबतच मॉडेलिंग आणि इतरही बिझनेसमधून कमाई करते.
अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या ही 2019 मध्ये सिनेमा 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' मधून बॉलीवुडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर 'पति पत्नी और वो', 'गहराइयां', 'ड्रीम गर्ल 2', 'खो गए हम कहां' या सिनेमांत काम केलं. काही वर्षांमध्ये तिने ना केवळ फिल्म तर लग्झरी आणि ग्लॅमरस लाइफस्टाईल मुळे ती चाहत्यांच लक्ष वेधते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार 'चांद मेरा दिल'ची अभिनेत्री अनन्या पांडेची जवळजवळ 74 कोटी रुपये (9 मिलियन अमेरिकन डॉलर)इतकी नेटवर्थ आहे. तिने इतकी संपत्ती सिनेमा फिस, ब्रँड डिल्स आणि गुंतवणूक केली.
मीडिया रिपोर्टनुसार, अनन्या पांडे एका चित्रपटासाठी अंदाजे 3कोटी रुपये मानधन घेते. अनन्या सध्या बॉलिवूडमधील 'Gen Z' (जनरेशन Z) मधील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे आणि इन्स्टाग्रामवर तिचे 26.3 मिलियन(26.3 million) फॉलोअर्स आहेत.
ब्रँड एंडोर्समेंट्सच्या (जाहिरातींच्या) माध्यमातून अनन्या पांडे मोठी कमाई करते. तिने 'Drools', 'Skechers', 'Hide & Seek' आणि इतर अनेक ब्रँड्सचे समर्थन (endorsement) केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रत्येक ब्रँड डीलसाठी ती अंदाजे 50ते 60लाख रुपये कमावते. शिवाय,2024 मध्ये ती लक्झरी फॅशन हाऊस 'Chanel' ची ब्रँड ॲम्बेसेडर बनली; यामुळे एंडोर्समेंट क्षेत्रातील तिचे स्थान अधिकच बळकट बनलं.
अनन्या पांडेने 2026 मध्ये स्वतःचे घर विकत घेतले. ती सध्या तिच्या अपार्टमेंटमध्ये राहते; हे अपार्टमेंट त्याच इमारतीत आहे जिथे तिच्या पालकांचे घर आहे. अगदी त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरच. तिचे हे गौरी खानने डिझाइन केलेले स्वप्नातील घर आहे.
तिचा कार संग्रह तिच्या ग्लॅमरस जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे. 'Asianet' च्या माहितीनुसार, 'Call Me Bae' या अभिनेत्रीकडे आलिशान वाहनांचा एक अप्रतिम संग्रह आहे. तिच्या गॅरेजमध्ये अंदाजे 1.70 कोटी रुपये किमतीची शानदार 'BMW 7 Series', 1.64 कोटी ते 1.84 कोटी रुपयांच्या दरम्यान किंमत असलेली स्टायलिश 'Range Rover Sport', आणि 75 लाख ते 88 लाख रुपयांच्या दरम्यान मूल्य असलेली 'Mercedes-Benz E-Class' या गाड्यांचा समावेश आहे. तिच्याकडे 'Skoda Kodiaq' ही गाडी देखील आहे.