जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा होऊ शकते.. महत्वाची बैठक, इराण अमेरिका..
GH News May 26, 2026 02:11 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाने जग वैतागले आहे. हे युद्ध आता फक्त तीन देशांपुरतेच मर्यादित राहिले नाही. या युद्धाचा थेट परिणाम जगातील अनेक देशांवर बघायला मिळत आहेत. भारतात महागाई वाढत असून कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. होर्मुज खाडी आता जर सुरू झाली नाही तर जगात ऊर्जेचे मोठे संकट निर्माण होईल. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली. भारताचे इराण आणि अमेरिका यांच्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. भारतीय जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत. स्थिती सामान्य होणे भारताकरिता अत्यंत महत्वाचे आहे. भारतात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला. यासोबतच सतत पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. होर्मुज खाडीतून आनंदाची बातमी यावी, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडत नाही.

अमेरिकेकडून कालच सांगण्यात आले की, इराणसोबत कराराच्या अत्यंत जवळ पोहोचलो आहोत. मात्र, इराणकडून थेट सांगण्यात आले की, अमेरिकेसोबत सध्याच कोणता करार होईल, असे कोणतेही संकेत नाही. इराण आपल्या मागण्यांवर आणि भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचे बघायला मिळतंय. दिल्लीतील बैठकीत बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, आज आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

जागतिक पुरवठा साखळ्यांवर परिणाम झाला आहे. क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी केले. एस. जयशंकर म्हणाले की, क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील जवळपास सर्व चर्चा सध्याच्या परिस्थितीवर झाली. क्वाडचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, आम्ही सुरक्षित आणि निर्बंध सागरी व्यापाराच्या मुद्द्यावर चर्चा केली. यासोबतच कतारमध्येही एक बैठक सुरू आहे, होर्मुज खाडीबाबत कधीही घोषणा होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय कायद्याचे काटेकोर पालन करण्याच्या महत्त्वावर पुन्हा एकदा जोर दिला. आमची चारही राष्ट्रे बाजारपेठ-आधारित अर्थव्यवस्था आहेत. आमचा ठाम विश्वास आहे की आर्थिक लवचिकतेला प्रोत्साहन दिले पाहिजे.  क्वाडच्या भाष्याने इराणचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.