Latest Marathi News Live Update : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा
esakal May 26, 2026 02:45 PM
Nashik : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा

कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले असून नाशिकमध्ये काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. चांदवडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. कांदा उत्पादकांनी संताप व्यक्त केला.

Mumbai Goa Highway महामार्गाचं काम अपूर्ण तरी टोलवसुली, जनआक्रोश समितीचं आंदोलन

खारपाडा येथील टोलनाक्या विरोधात जनआक्रोश समितीचे ठिय्या आंदोलन मुंबई गोवा महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असताना खारपाडा येथे सुरु केलेल्या टोल नाक्या विरोधात जन आक्रोश समितीने ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे ते अद्यापही पूर्ण झाले नाही. अर्धवट अवस्थेतील रस्त्यावर प्रशासनाकडून टोल वसूली सुरु करण्यात आली आहे.

Pune News विहिरीत पोहताना १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मावळच्या बधलवाडी परिसरात विहिरीत पोहताना १३ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वंश नरेंद्र कुंदलवार असे मृत मुलाचे नाव आहे

Chandwad Live कांद्याला हमीभावासाठी शेतकऱ्यांचा संताप उसळला

नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले असून कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपयांचा हमीभाव मिळावा तसेच सध्या मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे नुकसान भरपाई म्हणून पंधराशे रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होणार असल्याने परिसरातील राजकीय वातावरणही तापले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची मुंबईत २७ मे रोजी बैठक

छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या मैदानात ठाकरे सेना उतरणार

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तुलनेने कमी मतदार असतानाही ठाकरे सेना मैदानात उतरणार

यापूर्वी या जागी अंबादास दानवे निवडून आले होते

छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद ही महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय उद्धवसेनेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर २७ मे रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली

पोलिस कोठडीतील आरोपीला घरचे जेवण मिळाले, पोलिसाचे झाले निलंबन

हिंगोलीच्या कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये खुनातील आरोपीला घरचे जेवण देणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे, ही बाब सीसीटीव्ही फुटेज मध्ये निदर्शनास आली आहे, चक्क खुनातील आरोपीला जेवणाची मेजवानी मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी घरचा रस्ता दाखवला आहे, जगन पवार असे या निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून, पवार यांनी शासकीय सेवेच्या नियमांचा भंग केल्याचं पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी काढलेल्या आदेशात म्हटल आहे.

डिझेल जातेय कुठे? प्रत्येक पंपावर तलाठ्यांचा ‘वॉच’ ठेवण्याची तयारी

डिझेल जातेय कुठे? प्रत्येक पंपावर तलाठ्यांचा ‘वॉच’ ठेवण्याची तयारी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवडाभरापासून डिझेल खरेदीसाठी वाहनधारकाच्या शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कॅन घेऊन अनेक जण डिझेल घेऊन जात आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल डिझेल पंप चालक डिझेल पेट्रोल नाही म्हणून पेट्रोल पंप बंद ठेवत असल्याचेही निदर्शनास आलेल्या आहे. या दोन्हीही वर लक्ष ठेवण्यासाठी आता प्रशासनाने आता नवा फंडा आखण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलपंपांवरून होणाऱ्या डिझेल विक्रीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पंपावर तलाठ्यांची नियुक्ती करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. डिझेलचा साठा नेमका कुठे आणि किती प्रमाणात वापरला जातो.

ट्रॅव्हल्समधील १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

ट्रॅव्हल्समधील १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड

बेंगलुरूहून राजस्थानकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमधील तब्बल १९ लाख ५२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड करण्यात वडगाव पोलिसांना यश आलं आहे. मध्यप्रदेशातून आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

‘आयपीएल’वर सट्टेबाजीचे रॅकेट उघड, इचलकरंजीत सहा जणांना अटक

Latest Marathi Live Updates 26 may 2026 : इचलकरंजी शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात फूटवेअर गोडावूनमध्ये सुरू असलेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत तब्बल ५८ लाख ९० हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यामध्ये महागडे मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, तसेच तीन आलिशान चारचाकी वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.