पुणे: पुण्यात काल रात्रीपासून (26 मे) जमावबंदीचे आदेश (Jamavbandi In Pune) लागू करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिकेने याबाबत परिपत्रक काढून 14 दिवस जमावबंदी लागू केली आहे. या जमावबंदीच्या काळात आंदोलनं, मोर्चे, सभांना बंदी असणार आहे. (Ban Public Gatherings In Pune) या जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर आणि या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. जमावबंदीच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"सोशल मिडीयावर पोस्ट लिहून सुप्रिया सुळेंनी म्हटलंय की, पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत".
"कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत? पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे, असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले…
— Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम आशियाई संकटाच्या पाश्वभूमीवर देशातील नागरिकांना आवाहन केले आहे. ज्यामध्ये सद्यस्थितीत पेट्रोलियमचे प्रती बॅरल दर वाढलेले असल्याने इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी यांचेकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना प्रस्तावित करण्यात येत आहेत. कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळभेटी दरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा. पुणे मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन कामानिमित्त मंत्रालय, उच्च्य न्यायालय व इतर ठिकाणी ये-जा करणेकरीता सार्वजनिक वाहतूक उपक्रम (एस.टी. बम, रेल्वे) इ. चा वापर करावा.