Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; रितेश भाऊ ठरला बॉक्स ऑफिसच किंग, वाचा कलेक्शन
Saam TV May 26, 2026 04:45 PM

'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

'राजा शिवाजी'ची मराठी सिनेसृष्टीत मोलाचा कामगिरी

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. या चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत झळकला. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका साकारली असून सिनेमाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून रितेश आणि जिनिलिया हा महाराष्ट्राचे लाडकी जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली. जिनिलिया चित्रपटाची निर्माती असून तिने सिनेमात सईबाईंची भूमिका देखील साकारली आहे. चित्रपटाचे २५ दिवसांची एकूण कमाई, जाणून घेऊयात.

View this post on Instagram