Kangana Ranaut Post For Aishwarya Rai: कान्समध्ये (Cannes Film Festival) सगळे सेलिब्रिटी दिसले पण, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) दिसली नाही, यावरुन सोशल मीडियावर बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं. अखेर 'कान्स क्वीन' ऐश्वर्या रेड कार्पेटवर झळकली आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai Bachchan) एकापेक्षा एक सरस लूकवर सर्वांच्या नजरा नजरा खिळल्या. पण, अनेकांनी तिला तिच्या वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं. अशातच आता ऐश्वर्याची बाजू घेण्यासाठी भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) पुढे सरसावली आहे. अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कंगना रनौत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ऐश्वर्या राय हिचा निळ्या रंगाच्या गाऊनमधील एक फोटो शेअर केला आहे. तसेच, ऐश्वर्याच्या लूक, वय आणि शारीरिक बदलांवरून टीका करणाऱ्यांना त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेमध्ये कंगना रनौत यांनी ऐश्वर्याच्या बाजूनं उभं राहून तिला पाठिंबा दर्शवला आहे.

कंगना रनौत यांची ऐश्वर्या रायसाठी पोस्ट (Kangana Ranaut Post For Aishwarya Rai)
खासदार कंगना रनौत यांनी इन्टाग्राम स्टोरीमध्ये ट्रोलर्सला उत्तर देताना लिहिलंय की, "फॅशन आणि स्टाईल म्हणजे, स्वतःला व्यक्त करण्याचं एक माध्यम. प्रत्येक जण आपापल्या दृष्टीनं आयुष्याकडे बघतो आणि स्वतःची ओळख तयार करतो. कोणत्याही महिलेला दुसऱ्यांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची काहीही गरज नाही..."
कंगना यांनी ऐश्वर्या रायच्या लूकचं कौतुकही केलं आहे. कंगना रनौत यांनी लिहिलंय की, ऐश्वर्या खूपच सुंदर दिसतीये आणि ज्यांना ती अजून वेगळी दिसावी, असं वाटतंय. त्यांनी आधी स्वतःला नीट पाहावं. इथे ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही. जर रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना पाहायची सवय नसेल, तर आता ती सवय करून घ्या, असं कंगना रनौत यांनी म्हटलंय.
ABP माझाच्या बातम्या LIVE...