गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) क्वालिफायर 1 सामन्यात इतिहास घडवला आहे. आरसीबीने या निर्णायक आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचं महाकाय आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने रजत पाटीदार याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात विरुद्ध 5 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. त्यामुळे आता आरसीबी हा सामना जिंकून थेट फायनलचं तिकीट मिळवणार की गुजरात अंतिम फेरीत धडक देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आरसीबीकडून गुजरातचा रेकॉर्ड ब्रेकआरसीबीने गुजरात विरुद्ध 255 धावा करण्यासह आपल्या विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. त्याशिवाय आरसीबीने मोठा विक्रम मोडीत काढला आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये गुजरातच्या नावावर असलेला सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आरसीबीने 234 धावा करताच हा विक्रम मोडीत काढला.
आरसीबीआधी प्लेऑफमधील एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गुजरातच्या नावावर होता. गुजरातने 2023 साली क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध 3 विकेट्स गमावून 233 रन्स केल्या होत्या. त्यानंतर तब्बल 3 वर्षांनी आरसीबी हा विक्रम मोडीत काढण्यात यशस्वी ठरली आहे.
रजत, विराट आणि कृणालचा तडाखआरसीबीसाठी रजत व्यतिरिक्त विराट कोहली आणि कृणाल पंड्या या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रजत पाटीदार याने 33 बॉलमध्ये नॉट आऊट 93 रन्स केल्या. रजतने या खेळीत 9 सिक्स आणि 5 फोर ठोकले. तर विराट आणि कृणाल या दोघांनी प्रत्येकी 43-43 धावा केल्या. देवदत्त पडीक्कल याने 30 धावा जोडल्या. वेंकटेश अय्यर याने 19 रन्स केल्या. तर जितेश शर्मा याने नाबाद 15 धावांचं योगदान दिलं. गुजरातसाठी जेसन होल्डर आणि कगिसो रबाडा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर प्रसिध कृष्णा याने 1 विकेट मिळवली.
आरसीबीची ऐतिहासिक कामगिरी
गुजरातकडे पंजाब किंग्सचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी🚨 RCB – HIGHEST TEAM SCORE EVER IN IPL PLAYOFF HISTORY 🥶 pic.twitter.com/MhOtENKAA9
— Johns. (@CricCrazyJohns)
दरम्यान आतापर्यंत प्लेऑफच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाबने 2025 साली मुंबई इंडियन्स विरुद्ध 204 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे गुजरात आरसीबी विरुद्ध किती धावांपर्यंत पोहचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.