बीडच्या परळी शहरात एका हॉटेलमध्ये थरारक प्रसंग घडला. परळीतील शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Camp) नेते शिवाजी शिंदे हे आपल्या हॉटेलमध्ये थांबलेले असताना त्या ठिकाणी आलेल्या एका युवकाने हात हातात कोयता घेत त्यांच्यावर हल्ला चढवला. याच घटनेत शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमधील इतर लोकांनी या युवकाला पकडून ठेवल्याने शिंदे यांचा जीव वाचवला. दरम्यान हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. (Beed Crime news)