Gold silver rate today: गेल्या तीन महिन्यांपासून मध्यपूर्व आशियातील तणावाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. वाटाघाटीच्या चर्चा निष्कळ ठरत असून अमेरिका इराण शांतता कराराबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. (USA- Iran Conflict) दरम्यान, मध्य आशियातील महागाई सातत्याने वाढत आहे. इंधन तुटवडा निर्माण होत असताना दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाला आहे. त्यामुळे भारतात सोन्याची आयात महागली आहे. परिणामी, सोन्याच्या दरात वाढ नोंदवली जात आहे. भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 58,440 रुपयांवर पोहोचला आहे. हा दर GST शिवाय असून प्रति 10 ग्रॅम करिता आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. किलोमागे चांदी 2 लाख 72 हजार 650 रुपयांवर गेली आहे . (Gold Silver Rates)
बुलियनस असोसिएशनच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे. राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव एक लाख 57 हजार 870 प्रति दहा ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा दर किलोमागे दोन लाख 71 हजार 920 रुपयांवर पोहोचलाय . कालच्या तुलनेत (26 मे 2026 ) सोन्याच्या किमतीत फारशी वाढ दिसून आली नसली तरी चांदीची किंमत 1 हजार 880 रुपयांनी वाढली आहे.
मुंबई - 24 कॅरेट - 1 लाख 58 हजार 280
- 22 कॅरेट - 1 लाख 45 हजार 90
पुणे - 24 कॅरेट -1 लाख 58 हजार 280
- 22 कॅरेट - 1 लाख 45 हजार 90
चेन्नई - 24 कॅरेट - 1 58 हजार 740
- 22 कॅरेट -1 लाख 45 हजार 512
नागपूर - 24 कॅरेट -1 लाख 58 हजार 280
- 22 कॅरेट - 1 लाख 45 हजार 90
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाल्याने सोन्या चांदीची आयात महागली आहे. तसेच इराण अमेरिका शांतता कराराच्या घडामोडी फिस्कटण्याची चिन्हे दिसत असल्याने तसेच US फेडच्या चलनविषयक धोरणामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याकडे कल दिसून येत आहे.
आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे तसेच मजबूत झालेला अमेरिकन डॉलर, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती याचा एकत्रित परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकी आणि इराणी सैन्यांमध्ये चकमक झाल्याच्या वृत्तानंतर सोन्याच्या कमोडिटी बाजारात बदल झाले. शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने केलेल्या इराण हल्ल्यामुळे दोन्ही देशातील परिस्थिती आणखी नाजूक झाली आहे. अनिश्चित जागतिक पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत.