अनन्या पांडेचं 'भरतनाट्यम' पाहून सोशल मीडियावर संताप; प्रचंड ट्रोलिंग, लेकीवर टीका होताना पाहून चंकी पांडेंची प्रतिक्रिया, म्हणाले ..
abp majha web team May 27, 2026 03:43 PM

Anannya Pandey Bharatanatyam trolling:  बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'चांद मेरा दिल ' या चित्रपटातील (Chand Mera Dil) एका क्लिपमधील भरतनाट्यम सादर करताना तिने केलेल्या हालचालींवर अनेकांनी टीका करायला सुरुवात केली. भरतनाट्यम आणि समकालीन नृत्याचा फ्युजन असलेल्या तिच्या या नृत्यावर अनेक जण नाराजी व्यक्त करत आहेत. ( Bharatanatyam Dance Controversy) काँग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद आणि क्लासिकल नृत्यांगना अनिता रत्नम यांच्यासह अनेकांनी अनन्या पांडेच्या नृत्यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केलीय.  अभिनेत्री अनन्या पांडेने पेट्रोलिंगला कोणताही प्रतिसाद दिला नसला तरी अभिनेते चंकी पांडे (Chunky Pandey) आपल्या मुलीच्या बचावासाठी उतरले आहेत. लोकांनी संपूर्ण तपशील न पाहता आपली मत बनवली आहेत. अनन्याने सादर केलेलं नृत्य हे पूर्ण भरतनाट्यम नसून एक फ्युजन सादरीकरण असल्याचं त्यांनी म्हटलं.

अनन्या पांडेचा डान्स व्हायरल; सोशल मीडियावर प्रचंड ट्रॉलिंग

22 मे ला प्रदर्शित झालेल्या अनन्या पांडेचा 'चांद मेरा दिल' चित्रपटातील अनन्याच्या भरतनाट्यम नृत्यामुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. विवेक सोनी दिग्दर्शित या चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. ही कॉलेज रोमान्स ड्रामा फिल्म प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अनन्या पांडेच्या डान्सचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. यामध्ये ती भरतनाट्यम नृत्याच्या वेशभूषेत दिसते. मात्र, या गाण्यात तिच्या कंटेम्पररी फ्युजन नृत्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीका होत आहे. 

लेकीचं ट्रॉलिंग होताच चंकी पांडे यांची प्रतिक्रिया

अनन्या पांडे च्या या डान्सवर सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं. लेकीचं ट्रॉलिंग होताच अभिनेते चंकी पांडे यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.  ईटाइम्सला बोलताना ते म्हणाले ' लोकांनी अनन्याच्या नृत्याला पूर्णपणे चुकीच्या नजरेने पाहिले आहे. कारण तिने सादर केलेलं नृत्य हे शुद्ध भरतनाट्यम नव्हतं . तर ते एक फ्युजन नृत्य सादरीकरण होतं. हे नृत्य एक प्रकारचा प्रायोगिक नृत्य सादरीकरणाचा भाग होता. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये सोशल किंवा कल्चरल इव्हेंट्समध्ये जसे परफॉर्मन्स होतात तसाच हा होता. ' असं चंकी पांडे म्हणाले.

ते पुढे म्हणाले ' कृपया लोकांनी अंदाज बांधणं बंद करावं आणि नृत्याला एका वेगळ्या नजरेने पहावं. शुद्ध भरतनाट्यम शिकण्यासाठी अनेक वर्षांची कडी मेहनत,  शिस्त आणि बारकावे लागतात ' असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले 'हा भविष्यातील ऍडव्हान्स नृत्य शैली आणि पारंपरिक नृत्य प्रकाराचं फ्युजन आहे. त्यांचा क्रिएटिव्ह मेळ घालून केलेलं सादरीकरण आहे.क्लासिकल परफॉर्मन्स नाही. मी लोकांना विनंती करतो की, हा चित्रपट पहा आणि प्रतिक्रिया देण्याआधी आधी संदर्भ समजून घ्या ' 

'चांद मेरा दिल' या चित्रपटात अनन्या पांडे, 'चांदनी' या भूमिकेत दिसली आहे. ही मुलगी एका भरत नाट्यम नृत्यांगनेची मुलगी असते. या चित्रपटात ती दोन वेळा स्टेजवर एक फ्युजन सादरीकरण करताना दिसते.पहिल्यावेळी जेव्हा कॉलेजमध्ये तिच्या एंट्रीचा सीन असतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा चित्रपटाच्या शेवटी. वायरल भरतनाट्यम नृत्य सादर करताना तिने भरत नाट्यम आणि हिप हॉप डान्स प्रकाराचा मेळ साधला आहे.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.