Deepali Sayyed Play Role Ashok Kharat Film: नाशिकमधील (Nahik News) भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. या प्रकरणानं सर्वांनाच हादरवून सोडलं, एवढंच काय तर, या प्रकरणानं राजकीय वर्तुळातही खळबळ माजली. कारण या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) नेत्या रुपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) नाव समोर आलं. अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्यात. तसेच, या प्रकरणातील अनेक आक्षेपार्ह्य व्हिडीओसुद्धा समोर आलेत. आता अख्खा महाराष्ट्र हादरवणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या (Bhondu Baba Ashok Kharat) काळ्या कृत्यांवर सिनेमा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, या सिनेमात रुपाली चाकरणकरांच्या भूमिकेत शिवसेना नेत्या (Shiv Sena Leader) आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री (Actress) झळकणार असल्याचं बोललं जात आहे.
नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांवर आधारित एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सैयद (Dipali Sayyed) या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. स्वतः दीपाली सैयद यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना हा खुलासा केला. या सिनेमात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय भूमिकेत असल्याची पुष्टी केली आहे. तेव्हापासूनच दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सिनेमात अशोक खरातचा ढोंगीपणा, या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणामागील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडलं जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता सामाजिक आणि राजकीय पैलूंवरही प्रकाश टाकणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर येणारा हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.
दिपाली सय्यद नेमकं काय म्हणाली?
'बिग बॉस 6' फेम अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाली की, "भोंदू खरातविषयी मला 'बिग बॉस' स्पर्धेतून बाहेर आल्यावर कळलं, असा एक बाबा समोर आला ज्यानं सगळीकडे खळबळ माजवली. अशोक खरातवर लवकरच सिनेमा येत असून मी हा सिनेमा काढत नाही. या सिनेमाचे निर्माते वेगळे आहेत, पण या सिनेमात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसणार आहे. लवकरच सिनेमाची माहिती तुमच्यासमोर येईल... पण, अशा भोंदूपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजं. हा एकटाच खरात नसेल तर असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील. कुठल्याही बाबाकडे जाताना जागरुकता ठेवा. लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या सिनेमात पाहाल असं त्यांनी म्हटलंय.
दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका?
अभिनेत्री दीपाली सय्यद या सिनेमात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबतही दीपाली सय्यद यांनी भाष्य केलं आहे. मी या सिनेमात भूमिका करणार असून ती भूमिका कोणती? ती आत्ताच सांगितलं तर काय मज्जा राहील. तुम्ही सिनेमा पाहा... माझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे, ती मला वाचू द्या... स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती भूमिका मला आवडली पाहिजे. त्यामुळे आधी मी स्क्रिप्ट वाचणार आहे. पुढच्या महिन्यापासून या सिनेमाचं शुटिंग सुरू होईल. त्यावेळी शुटींग ठिकाणीच मी मुलाखतीसाठी बोलवेन, असं सांगत दीपाली सय्यदनं त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवला आहे. पण, तरीसुद्धा दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांचीच भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.
रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आलेल्या राजकीय आरोपांविषयी दिपाली सय्यद काय म्हणाल्या?
अशोक खरात प्रकरण जेव्हा पहिल्यांदा उजेडात आलं, तेव्हा रुपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते, हे आरोप विरोधकांकडून आणि समाजमाध्यमांतून अशा दोन्ही स्तरांवरून झाले होते. या संपूर्ण वादाच्या संदर्भात दिपाली सय्यदनं आपलं मत व्यक्त केलंय. ती म्हणाली, "पाहा, राजकारणात कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सततच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना सामोरं जावंच लागतं. यात काहीच नवं नाही. मात्र, या संपूर्ण 'खरात प्रकरणामध्ये' रुपाली चाकणकर यांचा खरोखरंच काही सहभाग होता, की मग वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, हे तुम्हाला केवळ तो सिनेमा पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल..."
ABP माझाच्या बातम्या LIVE...