Dhurandhar : डॉन 3 च्या वादामुळे रणवीर सिंग सध्या वेगळ्याच चर्चेत आहे, मात्र असं असलं तरी त्यांच्या ‘धुरंधर’ आणि धुरंधर पार्ट 2 ने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त धमाका केलाय. 3000 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या या फ्रँचायजीवर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. याच दरम्यान ‘है जवानी तो इश्क होना है’ या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करणाऱ्या अभिनेता वरूण धवन यानेही धुरंधरबद्दल कमेंट केली आहे. मात्र ती कमेंट त्याच्यावरच उलटली असून लोकांनी वरूणवर तूफान टीका केली आहे. सध्या वरूणची एक क्लिपव व्हायरल झाली,ज्यामध्ये तो धुरंधरबद्दल बोलत होता आणि चित्रपटाच्या यशाचं संपूर्ण क्रेडिट त्याने दिग्दर्शक आदित्य धर याला दिलं. तो वडील डेव्हिड धवन यांच्याशी बोलताना म्हणला, ” तुम्ही धुरंधर चित्रपट पाहिला ना, आदित्य धरने तो ज्या पद्धतीने बनवला, जी ट्रीटमेंट दिली, म्हणजे तो दिग्दर्शकाचा विजय झाला ना ?” त्यावर त्याचे वडील, डेव्हिड धवन म्हणाले – हो अगदी खरं. पण त्यावरून आता लोकांनी वरूणवर टीका केली असन रणवीराला यशाची क्रेडिट मिळाल पाहिजे असं म्हटलंय.
वरुण धवनने नुकतेच त्याच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केलं. या कार्यक्रमादरम्यान, अभिनेत्याने ‘द डेव्हिड धवन फिल्म फेस्टिव्हल’ नावाचा एक विशेष भाग शूट केला. यामध्ये तो त्याच्या वडिलांची मुलाखत घेताना दिसला. या भागात वरूणने विचारलं, “आजकाल सिनेमाबद्दल खूप चर्चा होते. प्रत्येकजण चित्रपट निर्मात्यांना चित्रपट कसा बनवायचा याबद्दल सल्ला देत असतो. ते विचारतात, ‘आम्हाला चित्रपट बनवण्यासाठी स्वातंत्र्य का नाही?'” यावर त्याच्या वडिलांनी उत्तर दिले.
काय म्हणाले डेव्हिड धवन ?
वरुण धवनच्या प्रश्नाला उत्तर देताना डेव्हिड धवन म्हणाले, “माझ्या मते, ज्याच्या हातात पेन आणि फोन आहे तो प्रत्येकजण पत्रकार आहे. ते काहीही बोलू शकतात. आजकाल हे खूपच अवघड झालं आहे. कोणते चित्रपट हिट आहेत हेसुद्धा मला माहीत नाही. ज्या प्रकारे गोष्टी घडत आहेत, ते पाहता हे खूपच कठीण आहे. पण अभिनेते पुन्हा एकदा चित्रपटांना पुढे नेत आहेत. हे आधीही होते आणि आजही आहे.” पुढे वरुण धवनने विचारलं की, पुरेसे अभिनेते आणि चांगल्या पटकथा का नाहीत?. त्यानंतर त्याने विक्रांत मेस्सीच्या 12th Fail चित्रपटाचा उल्लेख केला. मग तो म्हणाला, “तुम्ही धुरंधर पाहिला आहे, ज्या प्रकारे आदित्य धर तो बनवत आहे आणि हाताळत आहे, तो दिग्दर्शकाचा विजय आहे का? नाही का?” त्यावर डेव्हिड धवन यांनी उत्तर दिले, “हो, दिग्दर्शक जिंकला.” पण इतर वेळी, त्यांच्या वडिलांनी असं म्हटलं की अभिनेत्यांचं क्रेडिट जास्त असतं.
dhurandhar was a director's success not actor's- varun dhawan
byu/Strict-Cup-6640 inBollyBlindsNGossip
यावरून वरूणवर बरीच टीका झाली. “मग ‘ॲनिमल’ हा चित्रपट’वंगा’चा यशस्वी चित्रपट होता, असं तुम्ही म्हणालात का ? तेव्हा फक्त रणबीर कपूरचं नवा झालंना.. मग, तुमचा चित्रपट फ्लॉप झाला तर तुमच्या वडिलांना जबाबदार धरलं जाईल का?”, असा सवाल एकाने विचारला. “त्यांना रणवीर सिंगच्या यशाचा हेवा वाटतो. ‘डॉन ३’ वरून गदारोळ सुरू आहे, त्यामुळे सगळेच बोलत आहेत.”, अशी टीका दुसऱ्याने केली. एकंदरच वरूणच्या विधानावरून चित्रपट चाहते चांगलेच भडकल्याचे दिसत आहे.