प्रसिद्ध कोरिओग्राफरकडे चाहतीची विचित्र मागणी
कोरिओग्राफर लोकप्रिय रिॲलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' चा परीक्षक होता
प्रसिद्ध कोरिओग्राफरने सलमान खानसोबतही काम केले आहे
चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा असते. यासाठी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याची संधी शोधतात आणि क्यूट क्षण कॅमेरात कैद करतात. पण काही चाहते खूपच विचित्र असतात आपण अनेक वेळा अतरंगी किस्से ऐकत असतो. अशात आणखी एक किस्सा समोर आला आहे. बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकाकडे त्याची चाहती एक विचित्र मागणी करते, जे एकूण कोरिओग्राफर थक्क होतो.
View this post on Instagram
'फिल्मीज्ञान'शी बोलताना लोकप्रिय रिॲलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' चे परीक्षक मुदस्सर खानने आपल्या चाहती महिलेची विचित्र ऑफर बद्दल सांगितले. मुदस्सर म्हणाला की, "मला आलेली सर्वात विचित्र ऑफर एका महिला चाहत्याची होती, जिने मला तिच्यासोबत रात्र घालवण्यास सांगितले कारण तिला माझ्यासोबत मुलहवे होते...हे ऐकूण मी थक्क झालो..."
पुढे मुदस्सर म्हणाला की, "मी ज्या चाळीत राहत होतो, तिथे एका मुलीने फक्त मला पाहण्यासाठी माझ्या घरासमोर घर भाड्याने घेतले होते... हे पाहून तिथल्या लोकांनी मला विचारले की, 'ही कोण आहे?'" त्यानंतर मुदस्सर म्हणाला, "मी त्या मुलीच्या घराच्या भिंतींवर माझे फोटोपाहिले. ती सतत त्याचे नाव घेत असे. मग एक दिवशी कंटाळू मी तिला निघून जाण्याची विनंती केली..."
View this post on Instagram
कोरिओग्राफर मुदस्सर खानने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत काम केले आहे. यामुळे मुदस्सर खानच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. २०१० मध्ये रिलीज झालेल्या 'दबंग' मध्ये मुदस्सरने सलमान भाईसोबत काम केले. 'हमका पीनी है' या गाण्यामुळे मुदस्सरला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर बॉडीगार्ड आणि रेडी चित्रपटातही मुदस्सरने डान्स कोरिओग्राफ केला. त्याची 'ढिंका चिका' आणि 'पांडे जी सीटी' गाणी गाजली. सलमान खानचा आगामी चित्रपट 'मातृभूमी' मध्ये देखील मुदस्सर सलमान खानसोबत नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत आहे.
Movie On Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातवर येणार चित्रपट; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री साकारणार महत्त्वाची भूमिका, काळ्या कृत्यांचा मोठ्या पडद्यावर खुलासा