- नागपुरात विविध पोलिस ठाणे हद्दीत २४ तासात तिनं जणांनी गळफास घेत आयुष्य संपविले
- यशोधरा नगर, हुडकेश्वर आणि हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
- यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय रोशनी नावांच्या तरुणीने मध्यरात्री घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली..
- हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नरसाळा येथील गोपाल टेके यांनी मानसिक तणावातून छताच्या लोखंडी छताला दोरी बांधून आत्महत्या केली.. पोलिस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत..
- तर हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोंढा परिसरात जयंत तरारे या २४ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली..
- जयंत हा बऱ्याच काळापासून आजारी होता. या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय.
Vidarbha News विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट- हवामान विभागाने आज विदर्भातील नागपूर सह वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशिम या 6 जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे...
- आज विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि भंडारा या 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.. तर फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज उष्णतेची लाट राहणार नाही असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे...
* कालही विदर्भातील या 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला होता...