‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच गौसेवा म्हणजेच गाईंची सेवात करताना दिसली होती. पती विकी जैनसोबत ती गाईंना कुरवाळताना, त्यांना चारा देताना दिसली होती. अंकिताचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं. परंतु त्यानंतर आता अंकिता एका कारणामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
अंकिता तिच्या पतीसोबत सध्या अबू धाबी आणि दुबईच्या दौऱ्यावर गेली आहे. या सहलीचे काही फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘माझ्या कॅमेरा रोलमधून अबू धाबीच्या प्रेमाची ही एक छोटीशी झलक. आम्ही खूप हसलो आणि अनेक आठवणी बनवल्या’, असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
अंकिताने वॉर्नर ब्रदर्स फन झोन आणि वंडर वुमनलाही भेट दिली. त्याठिकाणी तिने फोटोशूटसुद्धा केलं. मात्र त्यानंतर ती इस्लामी संस्कृतीला अनुसरून तशा पोशाखात दिसली. पांढरी पँट आणि शर्ट अशा कॅज्युअल लूकमध्ये विकी होता. तर अंकिताने हिजाब घातला होता. यावरून तिच्या धार्मिक श्रद्धांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अंकिताने जीन्स आणि टी-शर्टसोबत हिजाब परिधान केला होता. या पोशाखात अंकिता आणि विकीने फोटो काढले आणि सोशल मीडियावर केले. या दोघांनी तिथल्या मशिदीलाही भेट दिली. यावरून युजर्सनी अंकितावर टीका करण्यास सुरुवात केली. अशा वेगळ्या धार्मिक पद्धतींचा अवलंब करणं अमान्य असल्याचं काहींनी म्हटलंय. तर काहींनी तिच्या हिजाब घालण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नुकतंच तिने एका गोशाळेला भेट दिली होती आणि तिथे गौसेवा करत सनातन धर्माचं ज्ञान देत होती. आता ती हिजाब घातलेली दिसतेय, हिंदू नेहमीच स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवतात, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केलं. तू एक मराठी मुलगी आहेस, तुला हे शोभतं का, असाही सवाल काहींनी केला आहे.