Pravin Tarde 'Deool Band 2' Movie Box Office Collection:
प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' हा चित्रपट सध्या धुमाकळू घालत आहे. देवाची भक्ती आणि श्रद्धा यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज आठवडा पूर्ण होऊनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. सोशल मीडियावर चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील प्रेक्षकांचे आभार मानत व्हिडीओ शेअर केली आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने ₹३.३५ कोटींची कमाई केली. आज आठवडा पूर्ण झाला असून ७ व्या दिवशी चित्रपटाने एकूण किती कमाई केली आहे? हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
View this post on Instagram
'देऊळ बंद २' हा चित्रपट 21 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती.तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३.११ कोटी रूपयांचा गल्ला कमावला होता. संपूर्ण आठवडा या चित्रपटाने कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची सातव्या दिवसाची कमाई समोर आली आहे. बुधवारी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाने सातव्या दिवशी किती कमाई केली आहे? हे पाहूया. Sacnik च्या रिपोर्टनुसार प्रवीण दिग्दर्शित देऊळ बंद 2 चित्रपटाने 7 व्या दिवशी 1878 शोजमधून ₹3.35 कोटींचे नेट कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई 25.85 कोटी रूपये इतकी आहे.
'देऊळ बंद २' चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई:
दिवस १ - 2.45 कोटी रुपये
दिवस २ - 2.55 कोटी रुपये
दिवस ३ -4.85 कोटी रुपये
दिवस ४ - 5.90 कोटी रुपये
दिवस ५ - 3.40 कोटी रुपये
दिवस ६ - 3.35 कोटी रुपये
दिवस ७- 3.35 कोटी रुपये
एकूण 25.85 कोटी रूपये
View this post on Instagram
'देऊळ बंद २' हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. आता त्याचा सिक्वेल असलेल्या ‘देऊळ बंद २’लाही तसाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटात अध्यात्म, श्रद्धा, रहस्य आणि मनोरंजन यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.