नीट परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट, दगाफटका टाळण्यासाठी परीक्षेची जबाबदारी इंडियन आर्मीवर? केंद्
Marathi May 28, 2026 05:25 PM

NEET परीक्षेचा पेपर लीक: देशभरात प्रचंड खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाची (NEET Exam 2026 Paper Leak) व्याप्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. भविष्यात असा कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) आता थेट भारतीय लष्कराची (Indian Army) मदत घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी लष्कराकडे गुप्तता आणि सुरक्षेची जबाबदारी सोपवण्याबाबत सरकारकडून गंभीर विचार सुरू आहे. या संदर्भात दिल्लीत संरक्षण मंत्री (Defense Minister) राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह अन्य महत्त्वाच्या मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NEET Exam Paper Leak: CBI ची मोठी कारवाई: महाराष्ट्रातून 13 वी अटक

एकीकडे सरकार सुरक्षेच्या नवीन उपाययोजनांवर विचार करत असतानाच, दुसरीकडे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो म्हणजेच सीबीआय (CBI) या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी राज्यभरात मोठ्या कारवायांचे सत्र राबवत आहे. या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी दोघांना अटक (Arrest) केली असून, एकूण अटक आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील बारावी आणि तेरावी अटक सुद्धा महाराष्ट्रातूनच (Maharashtra) झाली आहे.

NEET Exam Paper Leak: लातूरचे डॉ. मनोज शिरुरे आणि पुण्यातील शिक्षक गजाआड

सीबीआयने लातूरमधील बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) डॉ. मनोज शिरुरे (Manoj Shirure) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचे लीक झालेले प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा गंभीर आरोप आहे. तर दुसरीकडे, पुण्यातील ‘APMA’ कोचिंग इन्स्टिट्यूटमधील भौतिकशास्त्राचे (Physics) शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह या विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली आहे. तेजस शाह याने मनिषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचे लीक झालेले प्रश्न मिळवले होते आणि मोबाईलमध्ये त्याचे नाव ‘GOD’ म्हणून सेव्ह केले होते, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

NEET Exam Paper Leak: देशभरात 49 ठिकाणी छापे, रॅकेट उघड होणार

नीट पेपरफुटीचे हे जाळे नष्ट करण्यासाठी सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर यांसह देशभरातील तब्बल 49 ठिकाणी छापे (Raids) टाकले आहेत. या कारवाई दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे (Documents), लॅपटॉप (Laptops) आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. परीक्षेपूर्वीच रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या आंतरराज्यीय रॅकेटचा पूर्ण पर्दाफाश करण्यासाठी सीबीआयचा कसून तपास सुरू आहे.

आणखी वाचा

BJP: मोठी बातमी: भाजपने भाकरी फिरवली! दिल्ली, हरियाणासह 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले; केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.