Ahilyanagar Bribe News: अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात (Ahilyanagar Police Force) एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचा (Nagar Taluka Police Station) पोलीस उपनिरीक्षक (PSI) गांगुर्डे हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau - ACB) जाळ्यात अडकला आहे. एका गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी तडजोडीअंती (Compromise) तब्बल 1 लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारण्यास संमती दर्शविल्याप्रकरणी गांगुर्डेच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पदोन्नती (Promotion) मिळाल्यानंतर कार्यमुक्त होण्याच्या दिवशीच ही कारवाई झाल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील नगर तालुका पोलीस ठाण्यात 15 जणांवर एक गुन्हा (Crime) दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रियेत सवलत देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे याने 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी (Demand) केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत 'एसीबी'च्या पथकाने संपूर्ण प्रकरणाची गुप्तपणे शहानिशा केली. यामध्ये गांगुर्डे याने 1 लाखाची लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे याला काही दिवसांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector - API) पदी पदोन्नती मिळाली होती. पदोन्नतीनंतर पोलीस मुख्यालयात (Police Headquarters) सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी (Training) त्याची निवड झाली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे त्याला तातडीने कार्यमुक्त करण्यात आले नव्हते.
अखेर ज्या दिवशी गांगुर्डे याला प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त केले जाणार होते, त्याच दिवशी हा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस मुख्यालयातच 1 लाखाची लाच स्वीकारण्याची संमती दर्शवणे गांगुर्डेला महागात पडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गांगुर्डेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास 'एसीबी'चे अधिकारी करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या