"गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात; भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण, 3 वर्षाचा चिमुकला देखील जखमी
मिकी घई, एबीपी माझा May 28, 2026 08:13 PM

Pune Crime: "गाडी हळू चालवा" म्हणणं पुण्यात दाम्पत्याला पडलं महागात पडलं आहे. भररस्त्यात दुचाकी अडवून पती-पत्नीला मारहाण झाली. यामध्ये वर्षाचा चिमुकला देखील जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 मे रोजी एक दाम्पत्य आपल्या 3 वर्षाच्या चिमुकल्यासह वाघोलीतील डिकॅथलॉन येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून ते दुचाकीवरून घरी परतत असताना सोयरीक गार्डनसमोरील चौकात यू-टर्न घेताना खराडीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनर कारने त्यांच्या दुचाकीला धक्का दिला.

यावेळी शुक्ला यांनी “गाडी हळू चालवा” असे सांगितल्याने कारमधील चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने शिवीगाळ सुरू केली आणि नंतर या दाम्पत्याला मारहाण देखील केल्याची घटना घडली.  या सगळ्या घटनेनंतर वाघोली पोलिसांनी 3 जणांविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नाही तर या मारहाणीत अगदी ३ वर्षाचा चिमुकला देखील जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची घटना

दुसरीकडे,  पिंपरी चिंचवड शहरात एका कपड्यांच्या दुकानात घुसून प्रियकराने आपल्याच प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयावरून झालेल्या वादातून (Pimpri Chinchwad Crime news) हा प्रकार घडला असून, संतप्त तरुणाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी आणि चापटांनी अमानुषपणे मारहाण (Pimpri Chinchwad Crime news) केली. हा सर्व थरार दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.(Pimpri Chinchwad Crime news)

विशेष म्हणजे, प्रेयसीला बेदम मारहाण केल्यानंतर या तरुणाचा राग शांत झाला आणि त्याने तात्काळ दुकानातच प्रेयसीचे पाय धरून तिची माफी मागितली. हा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (Pimpri Chinchwad Crime news) झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मात्र, इतका गंभीर प्रकार घडून आणि अमानुष मारहाण सहन करूनही संबंधित तरुणीने आपल्या प्रियकराविरोधात पोलिसांत कोणतीही तक्रार देण्यास साफ नकार दिला आहे. हा आमचा अंतर्गत वाद असल्याचे सांगत तिने कारवाई करण्यास नकार दिला असला, तरी या घटनेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Pimpri Chinchwad Crime news)

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.