Famous Poet Death: उर्दू साहित्यविश्वातील एक तेजस्वी पर्व संपले आहे. प्रख्यात उर्दू कवी, गझलकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बशीर बद्र यांचे गुरुवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून विविध आजारांशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची माहिती पत्नी राहत बद्र यांनी सोशल मीडियाद्वारे दिली. “बशीर साहेब आम्हाला सोडून गेले...” असा भावनिक संदेश त्यांनी शेअर केला. या बातमीनंतर साहित्यविश्व आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
उर्दू गझलांना आधुनिक काळात नवी ओळख मिळवून देण्यात बशीर बद्र यांचे मोठे योगदान होते. साधी, सहज आणि मनाला भिडणारी भाषा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. प्रेम, विरह, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील वास्तव यांचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या शायरी आणि गझलमधून केले. त्यामुळे त्यांना आधुनिक उर्दू गझलांचे सम्राट म्हणूनही ओळखले जात होते.
Riteish-Raja Shivaji Collection: रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई; २७ व्या दिवशीही केलं छप्परफाड कलेक्शन15 फेब्रुवारी 1935 रोजी अयोध्या येथे जन्मलेल्या बशीर बद्र यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ मधून पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठात उर्दू विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. पुढे त्यांनी मेरठ महाविद्यालयात उर्दू विभागात व्याख्याता म्हणून काम केले आणि अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी घटनांपैकी एक म्हणजे 1987 मधील मेरठ दंगली. या दंगलीदरम्यान त्यांचे घर जाळण्यात आले होते. या आगीत त्यांच्या अनेक मौल्यवान कविता आणि साहित्य नष्ट झाले. या घटनेनंतर त्यांनी मेरठ सोडून भोपाळ येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
Famous Actor Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि स्टँड-अप कॉमेडियन यांचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळसाहित्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय 2018 मध्ये त्यांना प्रतिष्ठित 'जोश-ए-उर्दू' पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार दुबईस्थित साहित्यिक संस्था ‘बझ्म-ए-उर्दू’कडून त्यांच्या भोपाळ येथील निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात आला होता.
बशीर बद्र यांच्या निधनाने उर्दू साहित्यविश्वाने एक महान कवी गमावला आहे. मात्र त्यांच्या गझला, शेर आणि साहित्यिक वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या शब्दांमधून व्यक्त झालेल्या भावना आणि जीवनदृष्टी साहित्यप्रेमींच्या स्मरणात कायम जिवंत राहतील.