ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार
गणेश लटके May 30, 2026 09:13 PM

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2026 | शनिवार

1) मराठा आरक्षणसाठी रणरणत्या उन्हात मनोज जरांगे पाटलांचं आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु, नेमक्या काय आहेत मागण्या?  https://tinyurl.com/5825svcj मराठा आरक्षण कक्ष ते नोंदी आणि प्रमाणपत्रांसाठी 8 दिवसांत हेल्पलाईन; मनोज जरांगेंना सरकारची 5 मोठी आश्वासनं https://tinyurl.com/2pb4cxje ओबीसींच्या ताटातील हक्काचं आरक्षण हिरावलं जाणार असेल तर, आम्ही ढेकळात आंदोलन करु, लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/356jb7ce

2) मराठा आरक्षणाबाबात सरकार सकारात्मक, संविधान आणि न्ययालयाच्या न्यायालयाच्या अधीन राहून निर्णय घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yc7tmbju मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा; मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास उद्रेक होऊ शकतो, मराठा आरक्षणावरुन खासदार शाहू महाराज आक्रमक https://tinyurl.com/wszsk43w ओबीसी आरक्षणाला सध्या तरी कोणताही धक्का नाही, पण जरांगेंच्या दबावामुळं धक्का लागला तर थेट रस्त्यावर उतरु, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला इशारा https://tinyurl.com/2uvr7z57 

3) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव; बळींची संख्या 22 वर, अनेक अधिकारी निलंबित https://tinyurl.com/3tsbvydu अवघ्या 6 हजार 600 रुपयांच्या फायद्यासाठी अनेकांचा बळी; दारूकांडाचा थरारक हिशोब समोर, योगेश वानखेडेचा धक्कादायक डेथ प्लॅन https://tinyurl.com/4nmkbphw 
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, तब्बल 5 हजार 929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त https://tinyurl.com/y92hdw34

4) मुंबईकरांना आणखी एक मोठा झटका! CNG दरात पुन्हा 2 रुपयांची वाढ; 15 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ; पीएनजीचे दरही वाढले https://tinyurl.com/3pdu2tnz पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मंत्री संजय राठोडांकडून तिलांजली; हेलिकॉप्टरमधून प्रवास, दौऱ्यात 20 पेक्षा अधिक शासकीय वाहनांचा लवाजमा https://tinyurl.com/325x63t2

5) शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश, जयंत पाटील म्हणाले हे आमच्यासाठी धक्कादायक, माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही https://tinyurl.com/2u5ytu85 

6) पक्षनिधीसाठी रक्कम द्या, निधी न दिल्यास राजीनामाही घेऊ; पार्थ पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह आमदारांना तंबी दिल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती https://tinyurl.com/yc8kxa3d पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्या गटात काय होतय हे मला माहित नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही, पक्षनिधीच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mkjtr3th

7) सातारा सांगलीत भाजप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लढतीची चर्चा, शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल https://tinyurl.com/3pnaz2sp रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधानपरिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवींचा अपक्ष अर्ज दाखल, महायुतीत पुन्हा तणाव https://tinyurl.com/388xmpcr

8) दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा https://tinyurl.com/ykx2e5hc हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तात्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश https://tinyurl.com/3xw3yzbv

9) संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस, प्रकरण मिटवून घ्यायला सांग'; साक्षीदार दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी https://tinyurl.com/33s7m4xm  क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं, धक्कादायक घटनेनं पवई हादरलं https://tinyurl.com/yzda4v84 मातृत्वाच्या नात्याला काळिमा! प्रियकराकडून पोटच्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; नवजात बाळाला विकण्याचा कट; चंद्रपुरातील संतापजनक प्रकार https://tinyurl.com/3vnysyn4

10) आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ट्रायलमध्ये विनेश फोगाटचा एकतर्फी विजय; पण वजन करताना पुन्हा ड्रामा, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/4bnufrv2 राजस्थान विरुद्ध गुजरात सामना 'फिक्स' होता? चाहत्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न, सगळेच हादरले, क्वालिफायर-2मध्ये नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/msmpd3r6 मुंबई इंडियन्सला रामराम ठोकताच हार्दिक पांड्या IPLचा इतिहास-भूगोल बदलणार?; 30 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यासाठी 3 संघ शर्यतीत https://tinyurl.com/m9yphuf6

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.