Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का
Saam TV May 31, 2026 11:45 AM

प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक स्थिती बिघडली

अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक

अभिनेत्री मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भोजपुरी चित्रपट आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम केलेली भोजपुरी अभिनेत्री मिताली शर्माची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. तिने करिअरच्या सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र कालांतराने ती इंडस्ट्रीतून गायब झाली. तिला चित्रपटांच्या संधी मिळणे बंद झाले.

मिताली शर्माला मर्यादित प्रोजेक्ट्समुळे मुंबईतराहण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मीडिया रिपोर्टनुसार, मूळची दिल्लीची मिताली शर्मा अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली. शहरात आल्यानंतर ती तिच्या कुटुंबापासून दुरावली, ज्यामुळे तिला भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला नाही.उत्पन्न नाही, पाठिंबा नाही आणि इंडस्ट्रीतून सतत मिळणारा नकार यामुळे अभिनेत्रीचे मानसिकआरोग्य बिघडले.

Famous Actor : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

मीडिया रिपोर्टनुसार, मिताली शर्मा मुंबईच्या लोखंडवाला भागातील रस्त्यावर अत्यंत दयनीय अवस्थेत आढळली. जिथे ती भीक मागताना दिसली. तिची ती भयंकर अवस्था पाहून लोकांना धक्का बसला. त्यानंतर हे प्रकरण पोलीसांकडे गेले. पोलिसांनीतिला रस्त्यावर शोधून काढले आणि ताब्यात घेतले. ती रस्त्यावर गोंधळ घालत होती. जेव्हा महिला पोलीसाने तिला हातकडी घातली तेव्हा अभिनेत्रीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

अभिनेत्रीची मानसिक आणि शारीरिक स्थिती पाहून पोलीसांनी तिला जेवण दिले. त्यानंतर तिला वैद्यकीय मदत पुरवली. पोलिसांनी तिला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अभिनेत्रीच्या फोटोवर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. तसेच तिच्यासाठी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.