मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; नराधमाने मुलीला एकटं पाहिलं अन्...
सत्यम सिंह May 31, 2026 02:43 PM

Mumbai Crime News: मुंबईतील (Mumbai) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी कितपत सुरक्षित आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका मेट्रो स्टेशनवर (Metro Station) 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (Molestation) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली पश्चिमेतील (Kandivali West) डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकात हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Mumbai Crime News: लिफ्टमध्ये एकटी पाहून साधला डाव

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी 11:50 च्या सुमारास घडली. पीडित 17 वर्षीय विद्यार्थिनी डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनवर आली होती. ती प्लॅटफॉर्म क्रमांक 1 (Platform No. 1) वर जाण्यासाठी लिफ्टचा वापर करत होती. लिफ्टमध्ये विद्यार्थिनीला एकटी पाहताच, तिथे आधीच उपस्थित असलेल्या एका अज्ञात नराधमाने तिचा विनयभंग केला. लिफ्टचे दार बंद असल्याचा फायदा उठवत त्याने पीडितेसोबत अश्लील चाळे केले. या अनपेक्षित प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरली.

Mumbai Crime News: सीसीटीव्ही नसल्यानं महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न

या घटनेनंतर मेट्रो प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि सुरक्षेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अत्यंत गर्दीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या मेट्रो स्टेशनवरील लिफ्ट परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेट्रो स्टेशनवर सीसीटीव्ही नसल्यामुळे आरोपीची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. लाखो प्रवासी रोज प्रवास करत असलेल्या मेट्रोमध्ये महिला सुरक्षेचा इतका गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Mumbai Crime News: अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित विद्यार्थिनीने तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार (Complaint) नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला आहे. मेट्रो स्थानकाबाहेरील आणि परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News : गुन्हा का नोंदवला नाही म्हणून राडा! महिलेचा दारू पिऊन नऱ्हे पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा, 41 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

Solapur Crime News: 'पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेला...'; बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, सगळे हळहळले!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.