गिल अन् साई सुदर्शनला स्वस्तात घरचा रस्ता दाखवत हेझलवुड-भुवनेश्वरने बेबी बाॅसची 'ऑरेंज कॅप' पक्की करून टाकली!
जयदीप मेढे June 01, 2026 12:43 AM

Vaibhav Sooryavanshi Orange Cap: आयपीएल 2026 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून पराभूत केले. वैभव सूर्यवंशी, साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांच्या दमदार खेळीमुळे ऑरेंज कॅपची शर्यत अत्यंत रोमांचक झाली होती. मात्र, अंतिम सामन्यात आरसीबीविरुद्ध साई सुदर्शन आणि शुभमन गिल स्वस्ता परतल्याने वैभवची ऑरेंज कॅप निश्चित झाली. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने 47 चेंडूंमध्ये 96 धावा करत शानदार फलंदाजी केली होती. 

शुभमन गिल अंतिम सामन्यात 10 धावा करून बाद

अवघ्या 15 वर्षीय वैभवने 16 सामन्यांमध्ये 237 च्या स्ट्राईक रेटने 776 धावा करत हंगामाची सांगता केली. गुजरात टायटन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा शुभमन गिल आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर राहिला. शुभमन गिल अंतिम सामन्यात 10 धावा करून बाद झाला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने 53 चेंडूंमध्ये 104 धावांची शानदार खेळी केली. त्याने आयपीएल 2026 मध्ये खेळलेल्या 16 सामन्यांमध्ये 732 धावा केल्या आहेत. गिलचा सलामीचा साथीदार साई सुदर्शन 16 सामन्यांमध्ये 722 धावांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेन 15 सामन्यांमध्ये 624 धावांसह यादीत चौथ्या स्थानावर आहे, तर इशान किशन 602 धावांसह पाचव्या स्थानावर आहे.

जीटीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि भुवनेश्वर कुमारची पर्पल कॅपसाठी स्पर्धा आहे. रबाडाने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दोन बळी घेतले. रबाडाच्या नावावर आता 28 बळी आहेत. भुवनेश्वर 16 सामन्यांमध्ये 28 बळींसह पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर 25 बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज अंशुल कंबोज 14 सामन्यांमध्ये 21 बळींसह चौथ्या स्थानावर आहे आणि सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज इशान मलिंगा 20 बळींसह पाचव्या स्थानावर आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.