Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा
Saam TV June 01, 2026 12:45 PM

ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

संगीत विश्वावर शोककळा

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

संगीत विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायकाचे निधन झाले. प्रसिद्ध गायक आणि अभिनेते चंद्रकांत लिमये यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंडित चंद्रकांत लिमये यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गायक गुवाहाटीला गेले होते, तेथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चंद्रकांत लिमये यांच्या पार्थिवावर मुंबईत १ जून २०२६ ला अंत्यसंस्कार करण्यात येईल.

चंद्रकांत लिमये यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी झाला होता. ज्येष्ठ गायकानेलहानपणापासूनच पं. नारायणराव व्यास, पं. वसंतराव राजोपाध्ये, पं. गजाननबुवा जोशी, पं. रत्नाकर पै, पं. चंद्रशेखर रेळे आणि पं. बाळकराम अशा गुरुंकडे गाण्याचे शिक्षण घेतले. चंद्रकांत लिमये हे ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य होते. अभिनेत्याने 'कट्यार काळजात घुसली' या नाटकात खाँ साहेबांची भूमिका साकारली होती. तसेच ते 'संगीतसंशयकल्लोळ' नाटकातही झळकले.

ज्येष्ठ अभिनेत्याने'संत गोरा कुंभार', 'संगीत सौभद्र', 'तो मी नव्हेच', 'पती गेले ग काठेवाडी' या नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांनी २००० मध्ये वसंतराव देशपांडे संगीत सभा या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. याअंतर्गत 'होरी के रंग', 'श्रुतीरंग वर्षा के', 'नाट्यरंग संगीताचे', 'हवेली संगीत' असे कार्यक्रम केले.चंद्रकांत लिमये यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि मुलं आहेत.

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत लिमये यांच्या निधनाने संगीत आणि मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसेच गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गायकाच्या निधनानंतर प्रेक्षक, चाहते आणि कलाकार मंडळींनी त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे. चंद्रकांत लिमये हे उत्तम गायक आणि अभिनेते होते. आपल्या गोड आवाजाने आणि भन्नाट अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांनी मंत्रमुग्ध केले.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.