काही महिन्यांपासून AI मुळे सोशल मीडियाचे रूपच बदलले आहे. कधी लोक स्वतःला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरताना दाखवतात, तर कधी बालपणीचे फोटो सिनेमॅटिक स्टाईलमध्ये बदलून पोस्ट करतात. आता इन्स्टाग्रामवर एक नवीन आणि भावनिक ट्रेंड वेगाने व्हायरल होत आहे. या ट्रेंडमध्ये लोक स्वतःचे फोटो भगवान शिव, श्रीकृष्ण, श्रीराम, श्री गणेश आणि श्री हनुमान यांच्या सोबत तयार करत आहेत.
विशेष म्हणजे हे फोटो केवळ आकर्षकच नाहीत, तर भावनिकही आहेत. अनेक फोटोमध्ये एखादी व्यक्ती दुःखी अवस्थेत दिसते आणि तिच्या बाजूला देवता तिला धीर देताना, समजावताना किंवा तिच्या दुःखात सहभागी होताना दाखवल्या जातात. त्यामुळे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
नेटकऱ्यांना का आवडतोय हा ट्रेंड?
AI च्या मदतीने तयार होणारे हे फोटो अनेकांच्या भावनांना स्पर्श करत आहेत. आयुष्यातील कठीण प्रसंगांमध्ये देव आपल्या सोबत आहेत, अशी कल्पना या फोटोंमधून व्यक्त केली जाते. त्यामुळे अनेक जण स्वतःचे फोटो या ट्रेंडनुसार तयार करून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर करत आहेत.
फोटो तयार करण्यासाठी AI Prompt:
एआय प्रॉम्प्ट (इंग्रजी)
“आरामदायी कॅफेच्या बाहेर रात्रीच्या वेळेचे एक अति-वास्तववादी भावनिक दृश्य तयार करा. मुख्य पात्र म्हणून माझा अपलोड केलेला फोटो वापरा. मुलीने लाल बांगड्या असलेला निळा प्रिंटेड कुर्ता घातला आहे आणि ती एका बेंचवर एकटी बसली आहे. ती खूप अस्वस्थ आहे आणि रडत आहे, दोन्ही हातांनी तिचा चेहरा झाकून आहे.
भगवान शिव तिच्या डाव्या बाजूला लांब केस, दाढी आणि शांत भावाने बसलेले आहेत, तिच्याकडे करुणापूर्वक पाहत आहेत. भगवान गणेश जवळच दैवी मुकुट आणि पारंपारिक दागिने घालून उभा आहे. निळ्या कातडी, मोरपंखांचा मुकुट आणि शोभिवंत दागिने असलेले भगवान श्रीकृष्ण तिच्या शेजारी काळजी घेणारे भाव घेऊन बसले आहेत. भगवान हनुमान त्याच्या पारंपारिक रूपात जवळच बसलेले आहेत, तिला हळूवारपणे सांत्वन आणि प्रोत्साहन देतात. भगवान राम सहानुभूतीपूर्ण आणि संरक्षणात्मक उपस्थितीसह शांतपणे बसले आहेत.
वातावरण सिनेमॅटिक, भावनिक, अध्यात्मिक, अत्यंत तपशीलवार, वास्तववादी प्रकाशयोजना, उबदार कॅफे लाइट्स, डेप्थ ऑफ फील्ड, डिव्हाईन ग्लो, अल्ट्रा एचडी, फोटोरिअलिस्टिक, इंस्टाग्राम ट्रेंडिंग शैली आहे.”
स्वतःचा फोटो कसा वापरायचा?
1. सर्वप्रथम तुमचा एक सिंगल फोटो तयार ठेवा.
2. फोटोमध्ये चेहरा स्पष्ट दिसत असल्यास चांगले परिणाम मिळतात.
3. Google Gemini किंवा इतर AI Image Generator उघडा.
4. तुमचा फोटो अपलोड करा.
5. वरील Prompt कॉपी करून पेस्ट करा.
6. ही सूचना जोडा: (माझी अपलोड केलेली प्रतिमा मुलीचा चेहरा म्हणून वापरा आणि इतर सर्व घटक अगदी सारखे ठेवा.)
7. काही सेकंदांत AI तुमचा फोटो तयार करून देईल.
AI फोटो बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
– धार्मिक प्रतिमांचा आदर राखा.
– फोटो सार्वजनिकरित्या शेअर करण्यापूर्वी तपासा.
– AI ने तयार केलेली प्रतिमा वास्तव नसते, हे लक्षात ठेवा.
– संवेदनशील किंवा दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने फोटो वापरणे टाळा.
(इमेज क्रेडिट: मिथुन)