Shape of Momo Feminist Film: बिश्नू (गौमाया गुरंग) दिल्लीतील (Delhi) नोकरी सोडून सिक्किमला आलीय. दिल्लीत ती एका जाहिरात कंपनीत कॉपीरायटर होती. गावाकडे ती आईसोबत एका दुखवट्यात सहभागी झालीय. तिथे सर्वांसमोर तिने लिहिलेली जाहिरात (Shape of Momo) वाचायला सांगितले जाते. जाहिरात इंग्रजीत आहे. गावात वाढलेली आपली मुलगी इतकं सुंदर इंग्रजी (Entertainment) लिहिते-वाचते, याबद्दल तिच्या आईला खूप अभिमान वाटतो. गावातील पुरुषमंडळी तिच्या आईने मुलीला मुलासारखे वाढवले याचे कौतुक करतात.
हे सर्व बिश्नू पाहतेय, ऐकतेय. आजूबाजूचे सर्व पुरुषमंडळी तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. तिला लग्न करायचे आहे का? हे कुणी विचारत नाही; गावातील कोणता मुलगा तिच्यासाठी योग्य ठरेल, याचीच चर्चा चालू आहे. आईला चांगली स्थळे सुचवली जात आहेत. दुखवट्याच्या घरातही ही चर्चा रंगात आली आहे.
त्रिवेणी गीता राय यांच्या ‘शेप ऑफ मोमो’ (२०२५) या सिनेमाची सुरुवात अशी होते. सिनेमा नेपाळी भाषेत आहे. नेपाळी नाव आहे ‘छोरा जैस्ते’, म्हणजे मुलासारखे.
पुरुषसत्ताक समाजात महिलेच्या जाणिवा-नेणिवांपलीकडे तिचे लग्न हाच सर्वात मोठा विषय बनतो. ३२ वर्षांची बिश्नू या सर्व घटनांकडे चिकित्सकपणे पाहततेय. घरात तीन पिढ्या आहेत, आजी, आई आणि गरोदर बहीण. परदेशात गेलेले वडील कधीतरी परत येतील या आशेवर आजी आहे. आई घराची व्यवस्था पाहते. बहीण येणाऱ्या बाळाची तयारी करतेय. त्यांच्या रोजच्या जगण्यात वडिलांचा काहीही सक्रिय सहभाग नाही, तरीही त्यांचं ‘अस्तित्व’ घरात, गावात आणि त्या तिघींच्या मनात सदैव आहे.
दिल्ली गाठून परतलेल्या बिश्नूला हे सर्व असह्य होतं. दिल्लीने तिला सहजासहजी स्वीकारले नव्हते. आता गावातही तिला ‘बाहेरची’ वाटू लागले आहे. दिल्लीत ती ‘आउटसायडर’ होती, गावातही ती ‘आउटसायडर’ बनत चाललीय. बिश्नू समाजाची विस्कटलेली घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करते. या प्रक्रियेत ती एकटी पडते. आतले आणि बाहेरचे दोघेही हा बदल स्वीकारायला तयार नाहीत. यातून तिला स्वतःच ‘मिसफिट’ असल्यासारखे वाटू लागते. शेप ऑफ मोमोची गोष्ट जगाच्या कुठल्याही भागात अशीच घडू शकेल.
‘शेप ऑफ मोमो’चा वर्ल्ड प्रीमियर दक्षिण कोरियातील बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. तेथे सिनेमाला दोन प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. त्यानंतर कोलकाता, मुंबई, न्यूयॉर्क, सिंगापूर अशा देश-विदेशातील अनेक महोत्सवांत हा सिनेमा सर्वोत्कृष्ट ठरला. हा त्रिवेणी गीता राय यांचा पहिला सिनेमा आहे. कथानक सिक्किममध्ये घडते. सिनेमात पर्यटकांना दिसणारा सिक्किम नव्हे, तर आतल्या भागातील सिक्किम दाखवण्यात आला आहे. बिश्नूच्या मनातलं वादळ इथल्या गर्द झाडीत घोंघावते आणि शांतही होते. डीओपी अर्चना घांगरेकरनं ही प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे कॅमेर्यात टिपलीये.
‘शेप ऑफ मोमो’ हा सिनेमॅटिक फेमिनिस्ट गेझ जगण्याचा स्त्रीवादी दृष्टिकोन आहे.
जगभरात महिला स्टोरीटेलर्सची एक मजबूत इकोसिस्टम उभी राहतेय. लोई झाओ यांचा ‘नोमॅडलँड’ (२०२०), सेलीन साँग यांचा ‘पास्ट लाइव्ह्स’ (२०२३) यासारखी उदाहरणे देता येतील. टायटॅनिकमधील केट विंसलेटनेही ‘गुड बाय जून’ (२०२५) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलंय. आपल्याकडे सध्या पायल कापडिया, झोया अख्तर, रिमा कटगी यांसारख्या दिग्दर्शिका आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहेत. या यादीत आता त्रिवेणी गीता रायची भर पडलीये.
बाई जेव्हा बाईची गोष्ट सांगते, तेव्हा ती जगाकडे बाईच्या नजरेतून बघण्याचा दृष्टिकोन देते. सई परांजपे, अपर्णा सेन, अरुणा राजे, मीरा नायर, दीपा मेहता, गौरी शिंदे, अश्विनी अय्यर तिवारी, कोंकणा सेन शर्मा, रिमा दास अशा अनेक दिग्दर्शिकांनी यापूर्वीच हा मार्ग मोकळा केलाय. कॅनमध्ये ‘ग्रँ प्री’ (पायल कापडिया) आणि बाफ्टा (लक्ष्मीप्रिया देवी) हे जागतिक पुरस्कार भारतीय महिला दिग्दर्शकांनी मिळवून दिलेत. सिनेमाच्या क्षेत्राला भारताला जगाच्या नकाशावर आणलंय. महिला स्टोरीटेलर्सची इकोसिस्टम मज़बुत होतेय. हे चित्रं आशादायी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
भावगीतांची सम्राज्ञी हरपली! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीत क्षेत्रावर शोककळा
ABP माझाच्या बातम्या LIVE...