गेल्या काही वर्षात पाकिस्तान आणि भारताचे संबंध तणावात आहेत. त्यामध्येच पाकिस्तानने पहलगाममध्ये हल्ला करून मोठी चूक केली. पहलगामवरील हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. हा पाकिस्तानला मोठा झटका होता. पाकिस्तानने स्वप्नातही विचार केला नव्हता की, भारत असे काही करेल. भारत तेवढ्यावरच थांबला नाही तर पाकिस्तानने मोठा दबाव स्थगिती काढण्यासाठी टाकला. पण भारताने हार मानली नाही. पाकिस्तान पाण्यासाठी मरत आहे. स्थिती भयंकर आहे. त्यामध्येच पाकिस्तानला दणका देत हे पाणी दुसरीकडे वळवण्याचा निर्णय भारताने घेतला. ज्याने पाकिस्तानची झोप उडावी. केंद्र सरकार यावर्षी 1 ऑगस्ट रोजी आपल्या सर्वात महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांपैकी एकाचे काम सुरू करणार आहे. ज्याचा खर्च लमसम 2300 कोटी आहे. हा नदीजोड प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही.
हा नदी जोड प्रकल्प 31 जुलै 2029 पर्यंत पूर्ण होईल, तसे टार्गेट भारताचे आहे. चिनाब नदीतील अतिरिक्त पाणी बियास नदीच्या खोऱ्यात वळवले जाईल. एनएचपीसीच्या कागदपत्रांनुसार, हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती जिल्ह्यातील लाहौल खोऱ्यात चिनाब नदीवर लिंक 3 प्रकल्प प्रस्तावित आहे. चिनाब नदीवर 19 मीटर उंचीचा एक बंधारा असेल. अंदाजे 8.7 किलोमीटर लांबीचा जलवाहतूक बोगदा बांधण्यात येईल.
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात जलविद्युत निर्मिती देखील शक्य आहे. भारताने मास्टर प्लॅन तयार केला आहे. हा प्रकल्प एकदा पूर्ण झाला की, भारताला मोठा फायदा आहे. दिवसरात्र एक करून लवकरात लवकर काम पुर्ण केले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतातून पाकिस्तानात पाणी जाणार नाही. शिवाय मोठ्या प्रमाणात विज निर्मिती केली जाईल.
काहीही करून भारताचे काहीच वाकडे पाकिस्तान करू शकणार नाही. भारतीय जलतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पुरेशा साठवणूक आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पश्चिमी नद्यांमधील मोठ्या प्रमाणातील पाणी न वापरता पाकिस्तानात वाहून जाते. चिनाब-ब्यास नदी जोड प्रकल्प पूर्ण झाला तर ही समस्या कायमची दूर होईल. शिवाय हे पाणी राजस्थानकडेही वळवण्यात मदत होईल.