आयपीएल 2026 च्या (IPL 2026) अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) गुजरात टायटन्सला (GT) 5 गडी राखून पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर फायनलमध्ये आरसीबीने गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखले. या टार्गेटचा पाठलाग करताना विराट कोहलीने 75 धावांची शानदार खेळी केली आणि इतर खेळाडूंच्याही योगदानाच्या जोरावर आरसीबीने सामना जिंकत ट्रॉफीवरही नाव कोरलं. अंतिम सामन्यात कोहलीला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू आणि लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. एवढंच नव्हे तर त्याने ऑरेंज कॅपसह अनेक पुरस्कार जिंकले. बक्षीस म्हणून कोणाला किती रक्कम मिळाली, ते जाणून घेऊया सविस्तर..
चँपियन आरसीबीला 20 कोटी
आयपीएल फायनल जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला विजेतेपदाबद्दल 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. एकाच मैदानावर दोन्ही ट्रॉफी जिंकल्यामुळे, हे संघाचे सलग दुसरे विजेतेपद आहे. तर उपविजेत्या गुजरात टायटन्सला 12.5 कोटी रुपये मिळाले.
वैभव सूर्यवंशीवर बक्षीसांची खैरात, कारही मिळाली
या स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने कमाल कामगिरी केली. त्याचा संघ फायनलमध्ये पोहोचला नसला, तरी त्याच तूफान खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावरही त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू असून या गुणवान खेळाडूवर आयपीएलमधए बक्षीसांचा वर्षाव झाला. वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅपचा विजेता ठरला, तसेच त्याला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द सीझन, इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन आणि मोस्ट सिक्सर्स हे पुरस्कारही मिळाले. त्याला सिएरा कारसह एकूण 45 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.
IPL 2026 अवॉर्ड्स लिस्ट
विजेते : RCB- 20 कोटी रुपये
उपविजेते : GT- 12.5 कोटी रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन : वैभव सूर्यवंशी- 15 लाख रुपये
ऑरेंज कॅप : वैभव सूर्यवंशी- 10 लाख रुपये
पर्पल कॅप: कगिसो रबाडा- 10 लाख रुपये
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन- वैभव सूर्यवंशी- 10 लाख रुपये
सर्वात जास्त डॉट बॉल: मोहम्मद सिराज- 10 लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन: वैभव सूर्यवंशी- सिएरा कार
सर्वात जास्त षटकार ( सिक्स) : वैभव सूर्यवंशी- 10 लाख रुपये
सर्वात जास्त चौकार (फोर) : साई सुदर्शन- 10 लाख रुपये
कॅच ऑफ द सीजन: मनीष पांडे- 10 लाख रुपये
प्लेअर ऑफ द फाइनल : विराट कोहली- 5 लाख रुपये
पिच अँड ग्राऊंड अवॉर्ड : ईडन गार्डन्स – 50 लाख रुपये
पिच अँड ग्राऊंड अवॉर्ड : धर्मशाला- 25 लाख रुपये
IPL Final मध्ये काय झालं ?
कालच्या फायनलमध्ये आरसीबीचा कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सचे दोन्ही सलामीवीर शेवटच्या षटकात चांगली कामगिरी करू शकले नाहीत. शुभमन गिल 10 धावांवर जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. साई सुदर्शन 12 धावांवर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या निशांत सिंधू आणि जोस बटलर यांनी डावाची गती मंदावली आणि मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले. गुजरातने 155 धावांचं टार्गेट ठेवलं.
या लक्ष्याचा पाठलाग करताना, विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. दुखापतीमुळे त्रस्त असलेला अय्यर 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर, देवदत्त पडिक्कल (1), रजत पाटीदार (15) आणि कृणाल पांड्या (1) असे तीन खेळाडून स्वस्तात बाद झाल्याने आरसीबीवर दबाव आला. मात्र, दुसऱ्या टोकाकडून विराट कोहलीची शानदार खेळी सुरूच होती आणि त्याने एक षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कोहलीने 42 चेंडूंमध्ये तीन षटकार आणि नऊ चौकारांसह 75 धावा केल्या.