Abdul Sattar Vs Atul Save : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत जागावाटपादरम्यान महायुतीला चांगलीच कसरत करावी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांच्या वादामुळे महायुतीत संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, आता महायुतीत अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून पक्षाचा आदेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर तर राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. येथे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता महायुतीतील वाद थेट चव्हाट्यावर आला आहे. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जात आहे, असा गंभीर आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.