'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
abp majha web team June 01, 2026 07:13 PM

Siddharth Jadhav on Ranveer Singh Deepika Padukone Reception: अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) मराठीसह हिंदीतही अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'मटका किंग 'या वेब सिरीजमधील त्याच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले. रणवीर सिंहची (Ranveer Singh) एनर्जी मॅच करणारा मराठीतला हा एकमेव असेल. दोघांनी सिंबा चित्रपटात एकत्र काम केल्यापासून सिद्धार्थ आणि रणवीर सिंह यांची चांगली मैत्री झाली. रणवीरने सिद्धार्थला आणि त्याच्या पत्नीला त्याच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीलाही बोलावलं होतं. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ जाधवने रणवीरच्या रिसेप्शन पार्टीतील एक अनुभव सांगितला. (Ranveer Deepika Reception Party) रिसेप्शनला गेल्यानंतर दहाव्या मिनिटाला या पार्टीतून पत्नीला घेऊन निघून गेल्याचं त्याने सांगितलं. पण त्याने असं का केलं? याचे उत्तरही सिद्धार्थने या मुलाखतीत दिलंय. 

Siddharth Jadhav: काय म्हणाला सिद्धार्थ जाधव?

अलीकडेच 'बॉलीवूड बबलला 'दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला ' रणवीर सरांच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलो होतो त्यावेळी मी 'स्टार स्टक ' झालो होतो. त्या रिसेप्शन पार्टीला सचिन तेंडुलकर सर, अमिताभ बच्चन सर, विकी कौशल सर असे सगळे स्टार्स होते.मी माझ्या पत्नीसोबत पार्टीला गेलो होतो. पार्टीत गेल्यावर तृप्तीला उद्या दहाव्या मिनिटाला म्हणालो 'चल आपण जाऊयात ' मग तिनेच मला थांबवलं.माझा असं झालेलं की सगळ्या कलाकारांना मी एकत्र पाहतोय. मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. पहिल्यांदाच अशा मोठ्या पार्टीत मी गेलो होतो '

'त्यानंतर आम्ही दोघं रणवीर सर आणि दीपिका मॅमला जाऊन भेटलो. त्या दोघांचा अभिनंदन केलं आणि मी लगेच पार्टीतून निघालो. एवढ्या मोठ्या कलाकारांना पहिल्यांदाच एकत्र पाहून मी भारावून गेलो होतो. आजवर या सगळ्यांना मी फक्त पडद्यावर पाहिलं होतं.त्यामुळे यांना प्रत्यक्ष पाहायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं.'असं सिद्धार्थने सांगितलं.

Siddharth Jadhav Ranveer Singh: सिद्धार्थ जाधव रणवीर सिंहची मैत्री कशी झालेली ?

रणवीर आणि सिद्धार्थची ओळख 'सिंबा' चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. सिद्धार्थने यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने त्या दोघांच्या मैत्रीविषयी सांगितलं होतं. तो म्हणालेला ' आमची मैत्री झालेली ती रोहित शेट्टीमुळे. सिंबा चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही एकत्र विमानाने प्रवास करत होतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्यानंतर चित्रीकरणादरम्यान आमच्यात छान मैत्री निर्माण झाली. आमच्या दोघांमध्ये आणखी एक गोष्ट मैत्री होण्यासाठी कारणीभूत ठरली ती म्हणजे, आम्ही दोघे कितीही दंगा करत असलो तरी रोहित शेट्टीला मात्र आम्ही घाबरतो. असं सिद्धार्थने सांगितलेलं. दरम्यान रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांचा लग्न सोहळा 15 नोव्हेंबर 2018 रोजी झाला. इटलीतील लेक कोमो या जागी जवळचे कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न गाठ बांधलेली. लग्नानंतर रणवीर दीपिका ने मुंबईत शाही रिसेप्शन दिलं होतं. या रिसेप्शनला मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.