Puja Bhatt On Nude Photoshoot: अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड वादग्रस्त राहिलं आहे. ती कायम तिच्या बोल्डनेससाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिच्या फोटोशूटसह अनेकदा चित्रपटसृष्टीत तिने खळबळ उडवून दिली आहे. 90 च्या दशकात पूजा भट्टने (Puja Bhatt) केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. तिचं प्रचंड ट्रॉलिंग झालेलं. अनेकांनी तिच्यावर टीका केलेली. आता अनेक वर्षानंतर पूजाने तिच्या या वादग्रस्त फोटोशूटबद्दल मौन सोडले आहे. (Puja BHatt on Nude Photoshoot)
90 च्या दशकात पूजाचं बॉडी-पेंट मॅगझिन कव्हर प्रचंड चर्चेत आलं होतं. त्या काळात या फोटोशूटवर मोठा वादही निर्माण झाला होता. आता अनेक वर्षांनंतर पूजाने स्पष्ट केलं आहे की, त्या फोटोशूटमागचा उद्देश लोकांना धक्का देणं किंवा वाद निर्माण करणं नव्हता. विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत पूजाने या फोटोशूट बाबतीतील अनेक गौप्यस्फोट केले . ' या फोटोशूटची कल्पना पत्रकार दिनेश रहेजा आणि प्रसिद्ध फोटोग्राफर जगदीश माळी यांनी मांडली होती.
पूजा म्हणाली, “या फोटोमुळे मला एका बाजूला प्रचंड टीका सहन करावी लागली, तर दुसऱ्या बाजूला लोकांचं भरभरून प्रेमही मिळालं. पण माझ्यासाठी हा फोटोशूट कधीच वाद निर्माण करणारा नव्हता. दिनेश रहेजा, ज्यांचा मी आजही खूप आदर करते, त्यांनी मला डिमी मोअर हिच्या ‘Vanity Fair’ मॅगझिन कव्हरचा फोटो दाखवला होता. तो कव्हर मला खूप आवडला. त्यानंतर दिनेश आणि जीतू माझ्याकडे आले आणि असंच काहीतरी करायचं असल्याचं सांगितलं. त्यांनी मला विचारलं की मी तयार आहे का? मी लगेच होकार दिला. बॉडी पेंटिंग कोण करणार असं विचारल्यावर त्यांनी अण्णा सिंग यांचं नाव सांगितलं.”
पूजाने सांगितलं की, हा फोटोशूट तिने एका मोठ्या शूटिंग डे नंतर केला होता. त्या काळात ती 'फिर तेरी कहानी याद आयी' या चित्रपटातील ‘तेरे दर पर सनम’ गाण्याचं शूटिंग करत होती. ती म्हणाली, “त्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता माझं काम संपलं. त्यानंतर मी जगदीश माळी यांच्या घरी गेले. तिथे माझी बॉडी पेंटिंग करण्यात आली आणि फोटोशूट झालं. शूट संपल्यानंतर मी ते पूर्णपणे विसरून गेले होते. पण मॅगझिन बाजारात आल्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. मॅगझिन रिलीज होताच सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. पण त्याच काळात शहरात अत्यंत दु:खद घटना घडली. बॉम्बस्फोटासारख्या भीषण दुर्घटनेमुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे वळलं. त्या वेळी एका महिलेच्या बॉडी पेंट फोटोशूटपेक्षा अधिक गंभीर प्रश्न लोकांसमोर होते.”

या फोटोबाबत अनेक वर्षांपासून एक गैरसमज पसरलेला आहे, जो पूजाने आता दूर केला आहे. ती म्हणाली, “त्या फोटोमध्ये मी न्यूड नव्हते. Demi Moore हिच्या कव्हरमध्ये ‘बर्थडे सूट’चा अर्थ असा होता की ती पेंटखाली कपड्यांशिवाय होती. पण माझ्यासोबत तसं नव्हतं. मी अंडरवेअर घातलं होतं. आमच्या मर्यादा काय आहेत हे आम्हाला चांगलं माहिती होतं आणि आम्ही त्या ओलांडल्या नाहीत.”
त्या काळात हा कॉन्सेप्ट लोकांना खूप बोल्ड वाटला असेल, पण माझा हेतू कधीच वाद निर्माण करण्याचा नव्हता, असं पूजाने स्पष्ट केलं. ती म्हणाली, “कदाचित त्या काळात लोकांना हे खूप धाडसी आणि वेगळं वाटलं असेल. पण मी हे फक्त मला ती कल्पना आवडली म्हणून केलं. ज्या लोकांसोबत मी काम करत होते त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी ते केलं. यात कोणताही वाद निर्माण करण्याचा हेतू नव्हता. मी फक्त जशी आहे तशीच लोकांसमोर आले.” आजही त्या जुन्या फोटोची चर्चा होत असल्याबद्दल पूजाला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, “अलीकडे कुणीतरी पुन्हा त्या फोटोचा उल्लेख केला आणि लोक त्याला ‘कल्ट इमेज’ म्हणू लागले. पण अशा गोष्टी प्लॅन करून तयार होत नाहीत. मी फक्त माझ्या खऱ्या व्यक्तिमत्त्वासह लोकांसमोर आले होते. आजच्या काळात इतका खोटेपणा वाढला आहे की, खरं बोलणंही वादग्रस्त वाटू लागलं आहे.”