फ्रीजमध्ये अंडी कुठे ठेवावीत ?
Marathi June 01, 2026 09:25 PM




आपण सगळेच फ्रीजच्या दरवाजात असलेल्या एग ट्रे मध्ये अंडी ठेवतो. पण तुम्हाला माहीत आहे का ? की अंडी या एग ड्रे मध्ये ठेवल्याने तुमच्या तब्येतीवर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यावर तज्ज्ञांच मत काय आहे ते जाणून घेऊया.

अंड्याला सुपरफूड म्हटले जाते. कारण अंडी प्रोटीनचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे नाश्ता,दुपारचे जेवणच नाही तर रात्रीच्या जेवणातही आपण अंडी खातो. त्यासाठी डझनभर अंडी घेतो आणि फ्रीजच्या दरवाजातील एग ट्रेमध्ये ठेवतो. पण अंडी खाणे जितके महत्वाचे तितकेच ते योग्य तापमानात ठेवणेही महत्वाचे आहे.

तज्ज्ञांच्या मते,फ्रीजचा दरवाजा हा फ्रीजचा सर्वाधिक उष्ण भाग असतो. ज्यावेळी आपण फ्रीजमधील सामान बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडतो. त्यावेळी बाहेरील गरम हवा सरळ दरवाजाला आदळते. त्यामुळे दरवाज्याच्या एग ट्रेमध्ये ठेवण्यात आलेल्या अंडी काही वेळासाठी बाहेरील उष्ण तापमानच्या संपर्कात येतात. या उष्णतेमुळे अंड्या्च्या कवचावर मायश्चरायझर निर्माण होते. त्यामुळे अंड्याच्या आतील भागात साल्मोनेला बॅक्टेरिया झपाट्याने वाढतो. त्यामुळे अंडी खाण्यायोग्य राहत नाहीत. जर तुम्ही ती अंडी तुम्ही खाल्लीत तर फूड पॉयझनिंग, पोटदुखी, उलट्या, जुलाब यासारखे पोटाचे विकार होतात.

त्यामुळे अंडी फ्रीजच्या दरवाजामधील ट्रेमध्ये न ठेवता फ्रीजमध्य़े ठेवावीत. फ्रीजमधील मध्य किंवा खालच्या शेल्फमध्ये अंडी ठेवावीत. फ्रीजमधील तापमान थंड असल्याने अंडी जास्त काळ फ्रेश राहतात. अंडी ठेवण्यासाठी बाजारात कार्डबोर्डचे कार्टनही मिळतात. त्याचा तुम्ही उपयोग करू शकता.



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.