जून महिना सुरू झाला असून काही दिवसातच पावसाला सुरूवात होईल. पावसाळ्यात हवामानात सतत बदल होत असतो. अशा बदलत्या ऋतूत सर्दी, खोकला किंवा पोटाच्या तक्रारी सतत जाणवतात. पण दरवेळेला अशा लहान सहान आजारांसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही, तुम्ही बाल्कनी किंवा गच्चीवरील छोट्याशा कुंडीत लावलेल्या काही औषधी रोपांचा वापर करून घरच्या घरी रामबाण उपाय करू शकता. आज आपण लहान सहान आजारांवर गुणकारी ठरणारी रोपं लावून घरीचं हर्बल क्लिनिक कसं तयार करता येईल हे पाहूयात.
पुदिना (Mint)
पुदिना आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गुणकारी आहे. पोटाचे विकार, अपचन किंवा गॅसच्या समस्येवर हा रामबाण उपाय आहे. आठवड्यातून 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून पुदिना पोटात जाणं फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – Lucky Bamboo : वाळलेला लकी बांबू प्लांट होईल हिरवागार, करा हे बदल
कढीपत्ता (Curryleaves)
कढीपत्त्यांच रोप बाल्कनीत असायला हवं. जेवणाची चव वाढवणारा कञीपत्ता केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. रोजच्या फोडणीमध्ये त्याचा वापर करायला हवा.
तुळस (Tulsi)
तुळशीमध्ये ऍटीऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. ज्यामुळे ऋतूबदलात आरोग्य उत्तम राहते. तुम्ही सकाळच्या चहात किंवा पानांचा काढा बनवून पिऊ शकता.
कडुलिंब (NeemLeaves)
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्वचेचं इन्फेक्शन, खाज हे झाड खूप गुणकारी आहे.
कोरफड (Alovera)
त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी कोरफड वरदान आहे. याशिवाय किरकोळ भाजल्यास त्याजागी कोरफडीचा गर लावणे फायद्याचं ठरतं.
हेही वाचा – Monsoon Preparation: पावसाळ्यापूर्वी घरात ‘या’ गोष्टी ठेवा तयार; नाहीतर ऐनवेळी होईल धावपळ