भारतात प्रथमच रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका ब्रिटिश कुटुंबाने वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वच्छता, शांतता आणि आधुनिक सुविधांचे भरभरून कौतुक केले आहे. इन्स्टाग्रामवरील ‘द हचिन्सन फॅमिली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाच सदस्यांच्या या कुटुंबाने दिल्ली ते जयपूर दरम्यानच्या प्रवासाचा व्हिडिओ ऑक्टोबर 2025 मध्ये शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत 45 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
स्वच्छता आणि शांत वातावरणाने जिंकले मनप्रवासादरम्यान ट्रेन पकडण्यासाठी शेवटच्या क्षणी झालेली धावपळही त्यांनी व्हिडिओत दाखवली आहे. कुटुंबातील आईने सांगितले की, भारतातील हा त्यांचा पहिलाच रेल्वे प्रवास होता आणि तो अपेक्षेपेक्षा खूपच चांगला ठरला.
ट्रेनमध्ये प्रवेश करताच डब्यांची स्वच्छता आणि सुव्यवस्था पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सर्व प्रवासी शांतपणे बसलेले होते आणि संपूर्ण डब्यात प्रसन्न वातावरण होते. मुलींसाठी सीटजवळील टेबलची सुविधाही त्यांना विशेष आवडली.
आधुनिक सुविधांनी केले प्रभावितकुटुंबातील महिला सदस्याने ट्रेनमधील सुविधांचा विशेष उल्लेख केला. डब्यात भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारची स्वच्छतागृहे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट असल्याने मोबाईल आणि इतर उपकरणे सहज चार्ज करता आली.
प्रवाशांना मोफत बाटलीबंद पाणी देण्यात आले. तसेच सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होती. 28 किलो वजनाची सुटकेस वरच्या रॅकमध्ये ठेवताना थोडी अडचण आली, मात्र एकूण प्रवास अतिशय आरामदायी असल्याचे त्यांनी नमूद केले. सहप्रवाशांचे मैत्रीपूर्ण वर्तनही त्यांना आवडले.
वंदे भारतबद्दल काय म्हणाले?स्वच्छ डबे, आधुनिक सुविधा, शांत वातावरण आणि सौजन्यपूर्ण सेवा यामुळे वंदे भारतने त्यांच्या मनावर छाप पाडली. कुटुंबाने ट्रेनचे वर्णन "स्वच्छ, आरामदायी आणि उत्कृष्ट" असे केले. त्यांच्या मते, हा अनुभव त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच सरस होता आणि भारतीय रेल्वेचे आधुनिक रूप पाहून ते प्रभावित झाले.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षावव्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी वंदे भारतच्या सेवेचे कौतुक केले. काहींनी भारतात येणाऱ्या पर्यटकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी नागरिकांनी नागरी शिस्त पाळण्याचे आवाहन केले.
Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणारView this post on Instagram
दुसऱ्या व्हिडिओमध्ये या जोडप्याने दिल्ली ते जयपूर या सुमारे चार तासांच्या प्रवासाचा खर्च आणि मिळालेल्या खाद्यपदार्थांची माहिती दिली. प्रत्येक व्यक्तीसाठी तिकीटाचा खर्च 11 पाउंड, म्हणजेच सुमारे 1,400 रुपये होता.
प्रवासादरम्यान त्यांना डाएट मिक्सचर, आंब्याचा रस, कॅरमेल पॉपकॉर्न, कचोरीचा तुकडा आणि इन्स्टंट आल्याचा चहा देण्यात आला. रेल्वे कर्मचाऱ्याने सीटवर येऊन गरम पाणी दिल्यानंतर त्यांनी चहाचाही आस्वाद घेतला.
Pune Railway: दौंड-मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; प्रवाशांच्या वेळेत १५ मिनिटांची हाेणार बचत, ८ ते १० गाड्यांचे क्रॉसिंग टळणार