मोठी बातमी! पहलगाममध्ये 'हमास' पॅटर्न? NIA च्या संकेतांनी मोठी खळबळ… पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे गाझा कनेक्शन?
Tv9 Marathi June 02, 2026 08:45 PM

Hamas Pattern in Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याच्या तपासात नवीन धागा समोर आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात मोठे संकेत दिले आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना लष्कर -ए-तयबा (LeT) आणि तिची सहयोगी संघटना TRF च्या हमास कनेक्शनकडे दोषारोपपत्रात इंगित करण्यात आले आहे. एनआयए हा एक आंतरराष्ट्रीय कट तर नाही ना, या दिशेन तपास करत आहेत. तपास यंत्रणांना हमास आणि पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये मोठे सहकार्य असल्याचे समोर आले आहे. या ताज्या दाव्यामुळे चिंता वाढली आहे. आता तपास यंत्रणा हमास आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना यांच्यातील संबंधांचा तपास करत आहेत. भारताच्या दहशतवादी हल्ल्यात पहिल्यांदाच एनआयएने हमासचे नाव घेतल्याचे मानले जात आहे. तर या दहशतवादी समूहातील संबंधांची पडताळा घेण्यावरही यंत्रणेने भाष्य केले आहे. NIA ने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार तपास यंत्रणा पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तयबा, द रेजिस्टेंस फ्रंट (TRF), जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा आणि तिच्या सहयोगी संघटनांमध्ये काय कनेक्शन आहे हे तपासत आहे.

पहलगाममध्ये हमास पॅटर्न?

NIA नुसार, पहलगाम हल्ला हा पूर्वनियोजित हल्ला होता. हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्त्रायलमध्ये जो हल्ला केला होता. तशाच पद्धतीने पहलगाव हल्ला करण्यात आला. इस्त्रायलमधील हल्ल्यातूनच टीआरएफने पहलगाम हल्ल्याचे नियोजन केले. या दोन्ही हल्ल्यात हल्ल्याचे ठिकाणाची निवड, हल्ला करण्याची योजना आणि हल्ला घडवून आणण्याची पद्धत एक समान दिसते. एनआयएने अद्याप या संघटनांमध्ये कोणताही थेट संबंधाचा दावा केला नाही. पण त्यादृष्टीनेच तपास सुरू आहे. एक धागा एनआयएच्या हाती लागला आहे. त्यावरून अंदाज बांधण्यात आला आहे. आता तपास जसा वेगाने पुढे जाईल. यासंबंधीचे धागेदोरे हातील लागतील. तेव्हा याविषयावर एनआयए सविस्तर टिप्पणी करेल असे म्हटल्या जात आहे.

सुरक्षा एजन्सींचे मोठे संकेत

यापूर्वी सु्द्धा स्वतंत्र काश्मीरसाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना हमास आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांनी प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. काश्मीरमधील अनेक कारवायांमध्ये हे नेटवर्क समोर आले आहे. तर पहलगाम हल्ल्याचा पॅटर्न हा इस्त्रायलमधील हल्ल्याशी मेळ खात असल्याचा अंदाज लावल्या गेला आहे. जर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना आणि हमास यांचे पहलगाम हल्ल्याशी थेट कनेक्शन समोर आले तर भारतासाठी ही मोठी चिंतेची बाब असेल. हमासच्या कारवाया या इस्त्रायलशी संबंधित आहेत. पण दहशतवादी हे एकमेकांचे धोरण, योजना आणि शस्त्रांचा वापर करत असल्याचे तपासात समोर येत आहे. येत्या काही दिवसात या मुद्यावर मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.